Ticker

6/recent/ticker-posts

कमांडो गौतम धवने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित होणार.



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

तालुक्यातील सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि सर्वसामान्य नागरीकांना कायद्याची जनजागृती करून ते कायद्यापासून वंचित न राहावे यासाठी कार्यतत्परतेचा अविस्मरणीय ठसा उमटवणाऱ्या कमांडो गौतम धवने यांचा राज्यस्तरीय पातळीवर पूणे येथे होणाऱ्या तिसऱ्या महाधिवेशन प्रसंगी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था, पुणे (ISO प्रमाणित) आयोजित तिसरे राज्यस्तरीय महाधिवेशन दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार असून, या महाधिवेशनात प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार कमांडो गौतम धवने यांना जाहीर करण्यात आला आहे. 

हा मानाचा सन्मान ज्ञानमाता माहिती अधिकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आब्राहम आढाव यांच्या हस्ते प्रदान केला जाणार असून, महाराष्ट्रातील सामाजिक व पारदर्शक कार्याला नवे प्रेरणादायी वळण देणारा हा सोहळा ठरणार आहे. राज्यभरातील प्रसिद्ध समाजसेवक, ज्येष्ठ पत्रकार, विधिज्ञ, प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.कमांडो गौतम धवने यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्रातील तरुणाईसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ असेल.या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे कमांडो गौतम धवने यांच्या कार्याला नवे बळ, समाजात नवी ऊर्जा आणि सामान्य नागरीकासाठी प्रेरणादायी दिशा ठरणार आहे. जाहीर केलेल्या पुरस्काराबद्दल तालुक्यातील नागरिकांकडून कमांडो गौतम धवने यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.