Ticker

6/recent/ticker-posts

सौ. रेखा ताई गजानन काळमेघ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

 


आलेवाडी (दि. 2 सप्टेंबर):

येथील सौ. रेखा ताई गजानन काळमेघ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या 55 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने काळमेघ कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पती गजानन काळमेघ, तीन मुले, सुना व परिवार आहे. सौ. रेखा ताई या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने समाजोपयोगी कार्य करणारी एक संवेदनशील व्यक्ती हरपली आहे.

त्यांचा अंत्यविधी आज सकाळी आलेवाडी येथील स्मशानभूमीत श्रद्धेच्या वातावरणात पार पडला. नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.