देगलूर - प्रतिनिधी - जावेद अहेमद
शिव प्रतिष्ठान, पुणे आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र पुरस्कार २०२५ वितरण सोहळा आळंदी देवाची, पुणे येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात एकूण ७० मान्यवरांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिव प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा. मदनजी रेनगडे पाटील होते.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. दिनकर भेंडेकर, मा. डॉ. भागवत काटकर, श्री. दळपूसे सर, प्रा. विश्वर मोरतळे सर, प्रा. संतोष आव्हाडहे मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे संचालन प्रभावीपणे पार पडले असून, उपस्थित मान्यवरांनी शिव प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. या सोहळ्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळाले.





Social Plugin