Ticker

6/recent/ticker-posts

जव्हार शहरात नागरिक व प्रवाशांच्या सोयीसाठी पाणपोई सुरू


पाणपोईच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा स्तुत्य उपक्रम

जव्हार, दि. २० जून २०२६ (प्रतिनिधी : विजय अधिकार) – 

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक, प्रवासी तसेच कामगारांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने जव्हार शहरात पाणपोई सुरू करण्यात आली आहे.

संजरी जनरल स्टोअर, अलनुर मोबाईल शॉप, जय अंबे झेरॉक्स, सुवर्णा इंटरप्राईजेस, पी. के. टेलर आणि दारेन कम्युनिकेशन यांच्या संयुक्त सौजन्याने ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी प्रेमकुमार पांडे यांनी विशेष सहकार्य केले.

उन्हाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरून ये-जा करणारे प्रवासी, वाहनचालक, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.