‘प्रतिनिधि पेठ अनिल गाडर
"स्वच्छता हीच सेवा" या उपक्रमांतर्गत एक दिवस,एक तास,एक सोबत श्रमदान या उपक्रमाचा मा.ना.नरहरीजी झिरवाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पेठ तालुक्यातील भुवन गावांमध्ये शुभारंभ करण्यात आला.
यावेळी "स्वच्छता ही सेवा" या मोहिमेत पेठ तालुक्यातील सर्व नागरिकांनी सक्रियपणे सहभाग घ्यावा असं आवाहन मा.ना.नरहरीजी झिरवाळ साहेब यांनी केले आहे. स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असून हा उपक्रम देशाप्रति अभिमानाची भावना प्रतिबिंबित करणारा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मी आज भुवन गावामध्ये या स्वच्छता उत्सवात श्रमदान करण्यासाठी सहभागी झालो आहे असे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. यावेळी गावातील सर्व नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.त्यानंतर सर्व गावातील स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमासाठी पेठ तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती आशाजी गांगुर्डे,गटविकास अधिकारी श्री जे.टी.सूर्यवंशी साहेब,सहाय्यक गटविकास अधिकारी श्री बागुल साहेब,गट शिक्षण अधिकारी श्रीम.जाधव मॅडम, तसेच पेठ तालुक्यातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख,त्याचबरोबर सरपंच विलासजी दरोडे,नारायण दरोडे,ग्राम विकास अधिकारी रमेशजी पवार,विठ्ठल दरोडे,संजय दरोडे मुरलीधर दरोडे,जनाबाई दरोडे,चिंतामण सापटे उपस्थित होते.
स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल सांगळे,नामदेव भालेराव,सचिन मुळे,कमलेश सोनवणे,विनोद घुबे,साहेबराव दरोडे,गोकुळ दरोडे तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक,महिला मंडळ, युवकांनी प्रयत्न केले.





Social Plugin