अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी अंबड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत सरकारला थेट इशारा दिला.ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी करा,अन्यथा तीव्र आंदोलन उभारू अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.मत्स्योदरी देवी मंदिरापासून निघालेल्या या मोर्चात शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेले सोयाबीन,कापूस, तूर व मोसंबी हातात घेऊन सहभाग नोंदवला.
तहसील कार्यालयावर पोहोचताच शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा,शेतकरी एकजुटीचा विजय असो,जय जवान-जय किसान अशा गगनभेदी घोषणांनी प्रशासन हलवून सोडले.यावेळी हातात चाबूक घेऊन शेतकऱ्यांनी जमिनीवर फटकार देत सरकारला जागे होण्याचा इशारा दिला.
तहसीलदार विजय चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या वतीने सादर केलेले निवेदन स्वीकारले.अंबड तालुक्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा कुठल्याही अटी-शर्तीं शिवाय शेतकऱ्यांचे सर्व कर्ज सरसकट माफ करावे,विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी तात्काळ माफ करावी,खरीप २०१८ च्या प्रलंबित पीक विम्याची रक्कम तात्काळ द्यावी एनडीआरएफच्या नियमांनुसार नाही तर प्रतिहेक्टरी ₹५०,००० भरपाई द्यावी पीक विमा पाहणी ऑफलाइन करावी व विमा कंपनीचे कायमस्वरूपी कार्यालय सुरू करावे,जनावरांच्या चाऱ्यासाठी तात्काळ आर्थिक मदत द्यावी,यावेळी एका संतप्त शेतकऱ्याने सरकारला थेट इशारा देत म्हटले की सरकारने फक्त घोषणाबाजी केली मदत मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही.
आमच्या मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत,तर शेतकरी रस्त्यावर उतरले बिकट परिस्थिती निर्माण होईल.मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाल्याने त्यांचा रोष, संताप आणि संघर्ष स्पष्टपणे जाणवत होता.आता या शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांवर सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Social Plugin