अर्धापूर प्रतिनिधी/विश्वराज वाकोडे
मनण्यापेक्षा सातपुड्यातील आदिवासी बांधवाची रोडाली संस्कृती आकस्मित करून मराठवाड्यातील आदिवासी बांधवांना एक वेगळा संदेश दिला आहे.रोडाली : हा आदिवासी समाजातील एक प्रकारचा पारंपरिक सण किंवा उत्सव आहे, जो देव मोगरा मातेच्या वार्षिक उत्सवाच्या वेळी केला जातो. देव मोगरा माता रोडालीच्या माध्यमातून लोक आपल्या कुलदेवतेची प्रार्थना करतात आणि नवरात्री व शिवरात्री काळात आपला आनंद साजरा करतात.
गावात दरवर्षी दुर्गा घटस्थापना होतं होती पण या वर्षी दुर्गादेवी न बसवता देव मोगरा माताची स्थापना करून आपल्या संस्कृतीला उजाळा दिला आहे.रोज सकाळी आणि संध्याकाळी निसर्गावर आधारित आरती म्हणून प्रसाद दिला जातो.संध्याकाळी आदिवासी गीत लावून पारंपारिक नृत्य साजरे केले जात आहेहि प्रथा पडण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या संस्कृतीचा विसर होऊ नये आणि आपल्या आदिवासी देव देवतांची ओळख होऊन पारंपारिक सन उत्सव जोपासने काळाची गरज आहे.
आपण सध्याला पाहतच आहोत आरक्षणावरून पूर्ण महाराष्ट्र पेटला आहे व इतर काही समाज आपलीच संस्कृती पाळतात असे बोलबाला करत आहेत त्यामुळे आपण या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करने काळाची गरज आहे.





Social Plugin