किरण पाटील ग्रामीण प्रतिनिधी
अंतुली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचानालयात शिक्षक दिनानिमित्त भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले व सर्व गुरुजनांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष एस ए भोई सर ,श्रीमती रत्नाताई विभास कुलकर्णी ,संचालक अनिल वाडीले, पोलिस पाटील किशोर मेढे, पीक संरक्षण सोसायटी चेअरमन चुंनीलाल सोनवणे,बी.डी.बारी सर,ग्रंथपाल मधुकर वानखेडे, गोपाळ कोळी, सुरेश महाजन,बाळू बाविस्कर,उदय मेढे,शांताराम महाजन, सेवानिवृत्त गुरुजन,शिक्षक व मान्यवर , वाचक उपस्थित होते.





Social Plugin