अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अखेर ज्याची सर्वत्र उत्सुकता होती ती पोलीस पाटील भरती २०२५ ची गावनिहाय आरक्षण सोडत दि.०४ सप्टेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय,अंबड यांच्या वतीने जाहीर करण्यात आली.या सोडतीत अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेकडो गावांचा समावेश असून,सर्व प्रवर्गांसाठी पारदर्शक पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
या यादीत अनुसूचित जाती-जमाती,विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त व भटक्या जमाती,इतर मागास प्रवर्ग, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गांबरोबरच महिला उमेदवारांसाठी स्वतंत्रपणे आरक्षण ठेवलेले आहे.
*सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेले गावे*
बोरगाव खुर्द,वाडी शिराढोण,भद्रेगाव,काटखेडा, गोरी ,पांगरी, गोला,रामगव्हाण खुर्द,साकळगाव, राजेगाव,अंतरवाला बु,शहापुर,टाका,सारंगपुर, पांगरखेडा,हातडी,जालुरा,राहुवाडी,संत सेवालाल नगर,पिंपरखेड खुर्द,नारायणगाव,कोठी, देशगव्हाण, भांबेरी, आलमगाव, मठ जळगाव, पानेवाडी, जामखेड, शिदखेड ,झिरपी,पागीरवाडी, मुद्रेगांव,मासेगांव,बळेगांव,चिंचखेड,वडीलासुरा, चिकनगांव,सौदलगाव बु,पराडा,बनगांव आदी गावाचा समावेश आहे.
*महिला प्रवर्गासाठी आरक्षित गावे*
अनुसूचित जाती महिला–चंदनापुरी बु,यावल पिंप्री,बोर राजणी,अंतरवाली राठी,रामसगाव, उक्कडगांव आदी.
*अनुसूचित जमाती महिला*
वाघलखेडा,शिराढोण,धनगर पिंप्री, बदापुर.
*विशेष मागास महिला*
हरतखेडा,चाभारवाडी.
*विमुक्त जाती-अ महिला*
घोन्सी तांडा नं.१,पांगरा तांडा.
*भटक्या जमाती महिला*
बेलगांव,चुर्मापुरी,बठाण खुर्द,वडीगोदी,भगवान नगर,देवळी,भोकरवाडी आदी.
*इतर मागास महिला*
माळयाचीवाडी,हस्तपोखरी,राणी उंचेगाव, आपेगाव,ताडहादगाव,मठपिंपळगांव आदी.
*आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला*
येवला,बाचेगांव,मुर्ती,मुढेगांव,खडकावाडी आदी.
*खुला महिला*
करजळा,अरगडेगव्हाण,देवहिवरा,नागझरी, कृष्णनगर,रामनगर,गाढेसावरगाव,देवळी अंबड आदी गावे.
*खुला सर्वसाधारण प्रवर्गाखाली*
मुरमा खुर्द,इंदलगाव,भेडाळा,देवडेहादगाव, गुरुपिंप्री,कंडारी,लिंबोणी,कुक्कडगाव, सरफगव्हाण,सोनक पिंपळगाव,भालगाव,दुनगाव, ईश्वरनगर,वसतनगर,झिरपी तांडा,बक्ष्याचीवाडी, कौचलवाडी,गोविंदपुर आदी गावे
या सोडतीनंतर भरतीची पुढील प्रक्रिया जलदगतीने पार पडणार असून,इच्छुक उमेदवारांनी नियमानुसार अर्ज दाखल करावेत, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.





Social Plugin