Ticker

6/recent/ticker-posts

तुंग ( मंडल: कसबे डिग्रज).शिवपाणंद शेत-रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.



पत्रकार अभिजित भोईटे ग्रामीण प्रतिनिधी 

कसबेडिग्रज ता.मिरज जि.सांगली शेतातील पीक तयार होताच ते काढून योग्य ठिकाणी साठवले पाहिजे किंवा बाजारात विकले गेले पाहिजे. परंतु रस्ता नीट नसल्यामुळे शेतकऱ्यांना ते करणे शक्य होत नाही. पावसाळ्यात निघणारी पिके आर्थिकदृष्ट्या कितीही फायदेशीर असली, तरी रस्त्याअभावी ती विकण्याचा विचार शेतकऱ्यांना करता येत नाही. पाणंद रस्त्याची अनुपलब्धता हा यातील मोठा अडथळा होता. 

त्यामुळेच शेत पाणंद रस्ते मजबूत असावीत या भावनेने सांगली जिल्ह्यातील तुंग (मंडल कसबे डिग्रज ). येथील महसूल व वनविभाग जिल्हाधिकारी कार्यालय सांगली  मा. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. खारगे सर ( अपर मुख्य सचिव महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते  शेतकऱ्यांच्या सहभागातून नव्याने तयार केलेल्या पाणंद रस्त्याचा लोकापर्ण सोहळा पार पडला.