बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.निष्ठा निवास कुंभार हीने तालुकास्तरीय हिंदी निबंध लेखन प्रथम क्रमांक प्राप्त केला तर सुलेखन परीक्षेत कु.श्रेया विठ्ठल घाडगे हीने तृतीय क्रमांक प्राप्त केला असून दोघींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते . तालुकास्तरीय स्पर्धा पुसेगाव येथील श्री हनुमानगिरी हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आल्या . यामध्ये अनुक्रमे अनुलेखन सुलेखन, निबंध लेखन, वक्तृत्व , शुद्धलेखन, सामान्य ज्ञान आदी स्पर्धांचा समावेश होता.
कु.निष्ठा कुंभार ( इ.७ वी ) हीने निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक तर श्रेया घाडगे ( इ.६ वी ) हीने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना श्री अविनाश जंगम यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गोडसे , उपाध्यक्ष डॉ अजय घाडगे , सचिव प्रा सुनील दळवी, संस्था पदाधिकारी, सदस्य तसेच मुख्याध्यापक आर एम डांगे, सुनील वायदंडे, विलास काटकर, दत्तात्रय चव्हाण, अविनाश जंगम, सौ.संगिता कर्णे , पुरुषोत्तम सावंत, सौ.माधवी गोडसे , सौ.वैशाली फडतरे , बलराम घोरपडे, संगिता जाधव, अशोक माने, संताजी जाधव आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





Social Plugin