Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेनेचे आई जगदंबे साकडे निष्क्रिय सरकारने कर्जमुक्ती देओ


                                           

   बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून पूर्ण शेतकरी उध्वस्त झाला असून शेतकऱ्याला मोठ्या दिलासाची गरज आहे . खोटी आश्वासन देऊन सरकार सत्तेवर आलेले आहे . कर्जमुक्तीचे गाजर दाखवून मतदारांची फसवणूक केली आहे . पावसाने सोयाबीन, घेवडा सर्व पिके पाण्यात गेली . शेतकऱ्यांचा कांदा शेडमध्ये सडून जात आहे त्यास योग्य दर नाही या सर्व विषयावर शेतकरी उदासीन आहे याच अनुषंगाने सातारा जिल्हा शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा धिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. याच अनुषंगाने नवरात्र निमित्त भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी व शेतकऱ्यांचा प्रश्न उठवण्यासाठी शिवसेनेचे शेतकरी सेना जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी सातारा येथे बॉम्बे रेस्टॉरंट  रस्त्यांवर शेतकरी कर्जमुक्त होवो,,,   निष्क्रिय सरकारला सदबुद्धी येओ.. या आशयाचा  बॅनर लावला आहे याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे