किनवट प्रतिनिधी शेख अमिरपाशा
मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे सिंदगी गावाला मोठा फटका बसला आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले, अनेक घरांची पडझड झाली, तर पशुधनाची हानी होऊन गावकरी हवालदिल झाले आहेत. त्या ही परिस्थितीत महेश मुंडे यांनी जातीने लक्ष घालून मा. आमदार साहेब यांना बोलून व तहसीलदार यांच्याशी संपर्क करून शिरडकर बंधूंना बोलून दिलासा दिला व नुकसान भरपाई देण्यासाठी पाठपुरावा केला आहे या पुरामुळे आधीच संकटात सापडलेल्या नागरिकांवर आणखी एक मोठे संकट कोसळले आहे.
गावातील जळालेला ट्रान्सफॉर्म गेल्या आठवडाभरापासून बदलला नसल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडाले होते. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत साप,आणि जंगली प्राणी दिसण्याचे प्रमाण वाढले असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. नुकतेच गावात अजगर आणि अमेरिकन प्रजातीचा साप दिसल्याने नागरिक अधिकच भयभीत झाले आहेत.
दरम्यान, महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना सात दिवस अंधारात राहावे लागले. गणेशोत्सव आणि दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला. गावकऱ्यांच्या तक्रारी असूनही वेळेत कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला होता.
मात्र, दोन दिवसांपूर्वी किनवटला काही गावकरी भेटले असता भाजपा चे सक्रिय कार्यकर्ते महेश रघुनाथ मुंडे यांनी गावकऱ्यांच्या समोरच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना (भोकर,नांदेड)फोन करून “उद्या पर्यंत विद्युत ट्रान्सफॉर्म बसवण्याच्या स्पष्ट सूचना” दिल्या. त्यानंतर आज प्रत्यक्षात सिंदगी गावात नवा विद्युत ट्रान्सफॉर्म बसविण्याचे काम सुरू झाले आहे.
यामुळे अंधारग्रस्त व अतिवृष्टी बाधित ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, गाव आजच्या तारखेत प्रकाशमान होणार आहे. ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करताना म्हटले – “अतिवृष्टी, पूर आणि अंधार अशा तिहेरी संकटातून आम्ही जात होतो; पण महेश रघुनाथ मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला असल्याचे समाधान -सरपंच ,प्रशांत ताटकुंटवार ,
सतीश काकडे ,नितीन बैस ,बालाजी शिरडकर, कृष्णा चव्हाण , व इतर गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले





Social Plugin