Ticker

6/recent/ticker-posts

संघरक्षित अनिल कांबळे सेट परीक्षेत घवघवीत यश



 

भागवत खांदळे ग्रामीण गोरेगाव प्रतिनिधी 

      15जून 25 ला झालेली तज्ञ महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी परीक्षेत गोरेगाव पासून जवळ असलेल्या जवळा( बु ) संघरक्षित अनिल कांबळे हा विद्यापीठ अनुदान आयोगाचे घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी परीक्षा (सेट )मराठी विषयात सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला आहे. अत्यंत चाणक्ष व कुशाग्र बुद्धी असणारा संघरक्षित हा अपंग असून सुद्धा त्यांना अत्यंत अवघड असणारी सेट परीक्षा मराठी या विषयात पास होऊन इतरांसमोर एक आव्हान निर्माण केलेले आहे. पूर्णतः अपंग आहे तरीसुद्धा त्यांनी महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखे आहे .सर्व स्तरातून  अभिनंदन वर्षाव होत आहे .