अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
आज दिनांक 15-9-2025 रोजी प्रगती कॅम्पुटरचे संचालक आदरणीय श्री दिनेश फोके सर यांच्या वतीने विद्यालयातील मुख्याध्यापक श्री अभिमन्यू गाढवे सर यांचा सत्कार सन्मानपत्रक शाल आणि श्रीफळ व डिजिटल युगात कल्पकतेने जगाला शिकवणारे कोर्सेस संबंधीची पत्रक देऊन सन्मान करण्यात आला.(MKCL) तसेच विद्यालयातील शिक्षक राजेश भापकर सर,विश्वनाथ पोटफोडे सर,दत्ता शेरे सर,बंडू मामा या सर्वांचा सुद्धा सत्कार सन्मान पत्रक व शाल आणि श्रीफळ व कोर्सेस संबंधित पत्रक देऊन करण्यात आला.
तसेच श्री फोके सरांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना A I संबंधित पाच प्रश्न विचारले व इयत्ता दहावी च्या वर्गातील विद्यार्थिनींनी या पाच प्रश्नाचे उत्तरे दिली."कुमारी पठाण सायना चांदखा "हिचा सन्मान सत्कार स्मृतीचिन्ह व शाल देऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अभिमन्यू गाढवे सर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.





Social Plugin