Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्राचा खरा शिल्पकार शिक्षक असतो......प्राचार्य शहाजी डोंगरे



 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

शिक्षक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात ज्ञानदात्यांचा सन्मान केला जात आहे .राष्ट्राचा खरा शिल्पकार शिक्षक असतो असे प्रतिपादन  प्राचार्य शहाजी  डोंगरे यांनी केले. कला व वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आयोजित शिक्षक दिन या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे  प्रभारी प्राचार्य  डॉ आर.पी. भोसले, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा डॉ संजय क्षीरसागर. उपप्राचार्य डॉ ए.एस.जगताप, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. श्रीमती एम.बी. सोनार , प्रथमेश दळवी इत्यादी उपस्थित होते. पुढे आपल्या भाषणात प्राचार्य डोंगरे म्हणाले,

 समाजाची  जडणघडण, संस्कार आणि प्रगतीचा पाया शिक्षक  घालतो.भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिक्षकांचा सन्मान करण्याची ही परंपरा सुरू झाली. आज विविध शाळा, महाविद्यालये, व शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रांचे आयोजन करण्यात येते.शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची ज्योत पेटवितो. त्याच्या मार्गदर्शनाखालीच राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम नागरिक घडतात.

आजच्या या विशेष दिवशी, शिक्षकांचा आदर, त्यांचे कार्य आणि समाजातील त्यांचे योगदान याची  जाणीव करून  दिली.शिक्षकांचे योगदान हे राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे, शिक्षक हा विद्यार्थी व समाजाशी बांधिलकी असला पाहिजे आणि म्हणूनच शिक्षक दिन साजरा करणे ही आपली जबाबदारी आणि अभिमानाची गोष्ट आहे. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी. भोसले म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे एक गुरु असतो. माझ्या जीवनात अनेक शिक्षक भेटले त्यांनी पुस्तके ज्ञाना बरोबर जीवन कसे जगावे हे शिकविले शिक्षण हे चांगला माणूस होण्यासाठी असते. आपल्या  महाविद्यालयीन  जीवनातील अनुभव सांगितले.शिक्षके केवळ विषयाचे शिक्षक नसतात तर ते मित्र, मार्गदर्शक, आई-वडिलांची भूमिका देखील बजावित असतात. जो शिक्षक शाळा, महाविद्यालय घडवितो तो माणूस घडवितो आणि जो माणूस घडवितो देश घडवितो याविषयीची माहिती सांगितली. कार्यक्रम प्रसंगी प्रा.सौ. उज्वला मदने, प्रा.डॉ. एन.डी. लोखंडे यांनी  मनोगत व्यक्त केले.  तसेच कार्यक्रम प्रसंगी प्रथमेश दळवी, खुपिया शेख,कु.ज्ञानेश्वरी बोराटे, इत्यादींनी शिक्षकाच्या भूमिका निभावून त्यांच्या कार्याचे महत्त्व अनुभवले. प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे गुलाब पुष्प प्रमुख पाहुण्याच्या हस्ते देऊन शिक्षकांना सन्मानित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.अनिल जगताप, यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्रीमती कांबळे एक.टी. मानले तर आभार प्रा. एल.के.पवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील  सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.