Ticker

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जी आर विरोधात गोंदिया जिल्ह्यातील ओ.बी.सी बांधवांनी पुकारला एल्गार.



जितेंद्र बहेकार 

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र ओ.बी.सी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असून येणाऱ्या 21सप्टेंबर रोजी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मराठा समाजा करीता काढलेल्या जी आर विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा संकल्प हाती घेतला असून जिल्ह्यात सर्वत्र प्रत्येक गाव पातळीवर समाजाला जन जागृती करण्यासाठी ओबीसी समाजाच्या पुढाऱ्यांच्या वतीने सभा आयोजित केल्या जात आहेत .त्याच उद्देशाने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता ग्राम पंचायत पानगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये प्रामुख्याने प्रभाकर जी दोनोडे , भुमेस्वर जी मेंढे , कमलबापू जीं बहेकार , प्रकाश जी ब्राम्हणकर , मंगलाताई कोरे व गावातील असंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते.