Ticker

6/recent/ticker-posts

ईद मिलाद उन नबीचा उत्साहपूर्ण सोहळा संपन्न ख़िदमत ए ख़ल्क फाउंडेशनतर्फे कचोरी व पाणी वाटप.



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 


 कारंजा लाड - शहर ईद ए मिलादुन्नबी हा उत्सव कारंजा शहरांमध्ये सोमवारी करण्यात आला आहेत इस्लामच्या मान्यतेनुसार, पैगंबर मुहम्मद यांचा जन्म मक्का येथे झाला होता.हजरत मुहम्मद यांचा जन्म समाजात पसरलेला अंधार दूर करण्यासाठी आणि दुष्कर्मांचा अंत करण्यासाठी झाला होता. पैगंबर मुहम्मद यांचा जन्म इ.स. ५७० च्या सुमारास मक्का येथे झाला होता. त्यांचा जन्म रबी-उल-अव्वल महिन्याच्या १२ तारखेला मिलादुन्नबीच्या दिवशी झाला होता.ईद मिलाद उन नबीचा उत्साहपूर्ण सोहळा – ख़िदमत ए ख़ल्क फाउंडेशनतर्फे कचोरी व पाणी वाटप करण्यात आले समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या उपक्रमाचे स्वागत केले.

या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अवेस खान, उपाध्यक्ष मोहम्मद सोहेल, सचिव मोहम्मद फरदीन, सहसचिव अतीक गारवे, कोषाध्यक्ष मोहम्मद अनवार, सल्लागार मोहम्मद ज़ुबैर तसेच मुख्य सदस्य अब्दुल सादिक आणि तय्यब कालूत आदी मान्यवर उपस्थित होते.

ख़िदमत ए ख़ल्क फाउंडेशन हे गरजू व गरीब लोकांना आर्थिक मदत करणे, आजारी व रुग्णांना वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देणे, तसेच आपत्तीजनक प्रसंगी तातडीने मदत पुरविणे अशा कार्यात सातत्याने सक्रिय आहे. यासोबतच समाजात प्रेम, ऐक्य आणि बंधुभावाची भावना पसरविणे हे फाउंडेशनचे प्रमुख ध्येय आहे. धर्म, जात वा पंथ कोणताही असो, सर्वांना एकत्र आणून मदतीचा हात पुढे करणे हा संस्थेचा मार्ग आहे.

आणि हा उत्सव संपूर्ण देशभरात नव्हे तर जगभरात साजरा केला जातो कारंजा शहरात सुद्धा हे जामा मस्जिद येथून जुलूस निघाला आणि संपूर्ण शहर मध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला ईद-ए-मिलादुन्नबीच्या या उत्सव परवावर सर्व ग्रुप तर्फे सर्व भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या