Ticker

6/recent/ticker-posts

हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसुचित जमाती मध्ये समाविष्ट करा-सकल बंजारा समाजाची निवेदनाद्वारे मागणी



देगलूर /प्रतिनीधी 

      हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील लमानी/ बंजारा समाज हा अनुसूचित जमाती मध्ये असून त्याचं तत्त्वधारावर मराठवाड्यातील बंजारा, लमानी, लंबाडी हा समाज अनुसूचित जमाती या प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावा यासाठी देगलूर तालुक्यांतील सकल बंजारा समजाच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

   हैदराबाद गॅझेटीयर अनुसार बंजारा लंबाडी समाज हा tribe (जमाती) आहे.सन १९१४ नुसार tribe (जमाती) म्हणून हैदराबाद संस्थानात बंजारा व लंबाडी सर्वात जास्त लोकसंख्या ४,०४,६१४/- एवढी नोंद आहे तर या संदर्भानुसार गोर बंजारा लमानी समाजाला अनुसूचित जमाती ST मध्ये आरक्षण का मिळू नये? असा अँड सुरेखा पवार यांनी मिडिया समोर केला.

    ज्या हैदराबाद गॅझेट नुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय जीआर काढला गेला त्याच धर्तीवर बंजारा, लमानी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावे अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र धरणे , रस्ता रोको आदी प्रकारचे आंदोलन करण्यात इशारा विशाल पवार यांनी दिले.

      जर शासनाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणे होत नसेल तर आम्हा सीमावृत्ती भागातील लमानी ,बंजारा समाजांना तेलंगणा राज्यात जाण्यास परवानगी द्यावी असा आग्रह शंकरराव राठोड यांनी केली.या वेळी वाडी, वस्ती, तांड्यावरील बंजारा समाजाचे शेकडो समाज बांधव उपस्थित होते.