Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात 'दैनिक समर्थ राजयोग'चे जिल्हा प्रतिनिधी फारुक शेख यांना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट जिल्हा प्रतिनिधी पुरस्कार २०२५ ने सन्मानित



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ


 शिक्षक दिन आणि दैनिक समर्थ राजयोग या लोकप्रिय दैनिकाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२५ शुक्रवार,दि.५ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,नगर रोड,बीड येथे अत्यंत भव्य,शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या प्रेरणादायी सोहळ्यात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले.विशेषतः पत्रकारितेच्या क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या दैनिक समर्थ राजयोग चे जालना जिल्हा प्रतिनिधी श्री.फारुक शेख यांना‘आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट जिल्हा प्रतिनिधी पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.फारुक शेख यांचा गौरव जिल्ह्याचा अभिमान मा.श्री.जतीन रहमान (मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,बीड) यांच्या शुभहस्ते फारुक शेख यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

फारुक शेख हे जालना जिल्ह्यातील एक निर्भीड,सजग आणि समाजाभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात.त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू केवळ बातम्या देणे नव्हे,तर समाजघटनात सक्रिय सहभाग घेणे,हे आहे.त्यांनी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना विशेष मान्यता मिळाली.तसेच,अंबड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आवाज उठवला,आंदोलने केली आणि लोकप्रतिनिधींना जनतेच्या समस्या पोहोचवण्यासाठी माध्यम बनले.पत्रकार हा केवळ लेखक नाही,तो लोकांच्या भावना मांडणारा लोकप्रतिनिधी असतो,असे श्री.फारुक शेख यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले.पत्रकार संघटनांच्या बांधणीसाठी योगदानफारुक शेख हे केवळ बातम्यांच्या मागे धावणारे पत्रकार नाहीत,तर पत्रकार संघटनांच्या बांधणीसाठी,हक्कासाठी आणि सन्मानासाठी झटणारे कार्यकर्ते आहेत.पत्रकारांच्या सुखदुःखात सहभागी होणारे,अन्यायाविरुद्ध न डगमगता उभे राहणारे,समाज,राजकारण,क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये सक्रिय असणारे असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.या सर्व योगदानाच्या पार्श्वभूमीवर‘आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला,ही संपूर्ण जिल्ह्याच्या पत्रकारितेची प्रतिष्ठा वाढवणारी बाब ठरली आहे.जिल्ह्यातून सर्वच स्तरातून त्यांचे उत्स्फूर्त अभिनंदन करण्यात येत आहे.

कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती एक विराट सोहळा या भव्य कार्यक्रमास महाराष्ट्रभरातून आलेले शिक्षणतज्ज्ञ,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,साहित्यिक आणि प्रशासनातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये हे दिग्गज होते.आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्र

राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रज्ञादिदी.(प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालय,बीड),मा.नितीनचंद्र कोटेचा. (ज्येष्ठ समाजसेवक),मा.शुभम दिलीप धूत.(युवा समाजसेवक)राजकीय क्षेत्रातील मान्यवर मा.राजेंद्र जगताप मा.आ.सिराजोगद्दीन देशमुख,मा.आ.ॲड.उषाताई दराडे,मा.आ.सय्यद सलीम,मा.आ.जनार्दन तुपे.माजी आमदार पत्रकार संघटनांचे पदाधिकारी श्री संजय भोकरे,संतोष मानूरकर,वसंत मुंडे,गोविंद वाकडे,डॉ.विश्वासराव आरोटे,नवनाथ जाधव,अनिल सावंत,निलेश सोमानी प्रशासकीय अधिकारी मा.श्री.विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड,मा.श्री.नवनीत कॉवत.पोलीस अधीक्षक बीड, नीतीका विलास कॉवत.आयकर विभाग श्री शिवकुमार स्वामी.निवासी जिल्हाधिकारी,श्रीमती कविता जाधव S.D.O,मा.डॉ.संजय राऊत.जिल्हा शल्यचिकित्सक बीड,मा.शैलेश फडसे.मुख्याधिकारी,नगरपरिषद बीड, सौ.प्रियाराणी पाटील.शिक्षणाधिकारी,जि.प.बीड,प्रशांत दैठणकर,समंदर खान, प्रदीप भोगले,दत्तात्रय क्षीरसागर,लक्ष्मण बारगजे,सुशील खटोड समाजसेवक,पत्रकार संरक्षण समितीचा ठसा कार्यक्रमास पत्रकार संरक्षण समिती अंबड तर्फेही विशेष सहभाग नोंदवण्यात आला.उपस्थित सदस्य ज्ञानेश्वर साळुंके (तालुकाध्यक्ष),बाळासाहेब गावडे,गजानन पुरी,राजेंद्र गायकवाड,रजनिष कनके,संजय भुजाळ(बदनापूरकर),गणेश पाटोळे,दिपक पटेकर समितीतील इतर कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नव्हे ती समाजसेवेची एक शिस्तबद्ध, निःस्वार्थ,आणि धाडसी वाटचाल आहे हे फारुक शेख यांच्या कार्यातून दिसते.आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार २०२५ हा त्यांचा सन्मान तर आहेच,पण भविष्यातील पत्रकारांना मार्गदर्शन करणारा प्रेरणास्रोतही ठरेल.दैनिक समर्थ राजयोग च्या सहाव्या वर्धापन दिनी आयोजित हा राज्यस्तरीय सोहळा अनेकांच्या मनात दिर्घकाळ प्रेरणा जागवणारा ठरेल यात शंका नाही.फारुक शेख यांचे मन:पूर्वक अभिनंदन त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या..