दिग्रस येथे ईदे मिलादनिमित्त आयोजन हभप मधुकरराव खोडे महारांच्या हस्ते उद्घाटन महिला व जोडपिंचाही प्रथमच उत्स्फूर्त प्रतिसाद
राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : येथे ईद-ए-मिलादनिमित्त तब्बल २०१ हिंदू-मुस्लीम बांधवांनी स्वेच्छेने रक्तदान करून अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांना अपेक्षित व अभिप्रेत , अशी अभिनव व खरी आदरांजली वाहिली . हभप मधुकरराव खोडे महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रीय ऐक्याचे कृतीपूर्ण दर्शन घडले .
दिग्रस येथील डॉ एपीजे अब्दुल कलाम फोरम , गोदावरी मल्टिस्टेट अर्बन बँक , सफिया-रहेमान सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था , दिग्रस तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सदर पाचव्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यात मुस्लिमांसह इतर धर्मीय-बांधवांनी स्वेच्छेने रक्तदान करून राष्ट्रीय ऐक्याचे कृतिपूर्ण दर्शन घडविले .
मुस्लिमांसह पोलीस उपनिरीक्षक राजेश लाखकर , मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप महिपाल , विद्यनिकेतन इंग्लिश स्कूलचे प्राचार्य निवृत्ती ढोडरे , जिल्हा परिषद शाळा सावंगाचेमुख्याध्यापक गुलाब जगताप , आरोग्य विभागाचे डॉ कपिल मुनेश्वर , एस टी महामंडळाचे चंदन देविदास आडे , होमराज जाधव , पत्रकार किशोर कदम , गोदावरी बँकेचे अमोल बोंडगे , क्रीडा शिक्षक आशिष अगलदरे , अनिल किसनराव नवघरे , किशोर अमरसिंग जाधव , रोहन नारायण जाधव , संजय रामराव मुन्नारवार , पुरुषोत्तम नारायण पंडितकर , विजय मधुकर अंबुरे , धीरज गोविंदराव ठाकरेसह अंजुम परवीन अतिक शेख , माहलेका सय्यद राहील या जोडप्याने तर तब्बसुम परवीन मुख्तार खान , सूफिया परसुवाले , रेश्मा आसिफ इसानी , गुलानाज शेख नाजीम तसेच सुमैया परवीन सैय्यद इरफान या महिलांनीसुद्धा रक्तदान करून सर्वांना प्रोत्साहित केले . सर्व २०१ रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले . उद्घाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमीन चौहान यांनी , तर मजहर अहेमद खान यांनी आभार प्रदर्शन केले .
यवतमाळ-वाशीमचे खा संजय देशमुख , तहसीलदार मयूर राऊत , पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे , उपनिरीक्षक राजेश लाखकर , निवृत्त जिल्हा न्यायाधीश डॉ संतोष जयस्वाल , आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार , श्रीचंद राठोड , ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ विरेंद्र अस्वार , वैद्यकीय अधिकारी डॉ संजय जाधव , डॉ मनीषा कुमटे , शिंदे-शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजकुमार वानखडे , माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा प्रेम राठोड , जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख , भाजपचे पुसद जिल्हा उपाध्यक्ष डॉ विवेक भास्करवार , प्रमोद बनगीनवार , सुभाष कटेकर , निवृत्त शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी व डॉ वाल्मिक इंगोले , श्री बालाजी अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल शिंदे , उबाठा-सेनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र अरगडे , शहराध्यक्ष राहुल देशपांडे , अजिंक्य मात्रे , स्वप्नील दुधे , हर्षिल शाह , बाबूसिंग जाधव , एल पी राठोड , पालकमंत्री संजय राठोड यांचे स्वीयसहायक अमोल राठोड , प्रा सुधीर पथक , आर्यवैश्य समाजाचे तालुकाध्यक्ष सचिन बनगीनवार , भारत देशमुख , महाराष्ट्र बांबू मिशनचे सदस्य डॉ मनोज टेवरे , ज्येष्ठ साहित्यिक डॉ रविकिरण पंडीत व प्रा डॉ रुपेश कऱ्हाडे , प्रा डॉ ए डी जाधव , तेली समाजाचे तालुकाध्यक्ष संजीव चोपडे , ऍड सुधाकर जाधव , भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे किशोर कदम , निवृत्त प्राचार्य जयवंत लेढे , शंकर भगत , किरण बारशे , अस्थिरोग तज्ञ डॉ पवन जाधव , शिक्षक कृती समितीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक उबाळे , सदानंद आठवले , ऍड अनिल झाडे , दीपक फिसके , गोपाल शाह , विनायक दुधे आदी सर्वपक्षीय व सर्वधर्मीय बांधवानी रक्तदान शिबीराला सदिच्छा भेट देऊन आयोजक व रक्तदात्यांचे अभिनंदन व कौतुक करत सदर उपक्रमाची प्रशंसा केली
यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढी विभागाचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ अभिजित कपिले , समाजसेवा अधीक्षक आशिष दहापुते , अधिपरिचारक विजय कुर्हे व अमोल जाधव , अनिल राठोड , पूर्वेश इजगमवार , सचिन तिडके , राधिका आवारी , श्रुती लोहकरे , आंचल देवतळे , प्रणाली मुनेश्वर , संकेत ढोरे , वाहन चालक विकास जाधवसह डॉ एपीजेअब्दुल कलाम फोरम , गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी , सफिया-रहेमान सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था , दिग्रस तालुका पत्रकार संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले .





Social Plugin