Ticker

6/recent/ticker-posts

शिरड येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर



महा. ग्रा.न्युज (देवानंद महाजन)ता प्रतिनिधी हदगाव दि 26/9

पैनगंगा मल्टी स्टेट को-आऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.नांदेड . चेअरमन तथा जिल्हा अध्यक्ष निधी फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप मोतीबिदु शस्त्रक्रिया जिल्हा परिषद शाळा शिरड येथे आयोजित करण्यात येणार आहे कार्यक्रमांची वेळ सकाळी 10-00ते 5-00वाजेपर्यत ठेवण्यात आला आहे 

तरी शिरड परिसरातील व कोव्हळी, साप्ती,पेवा,मनुला,माटाळा,निवघा गावातील सुज्ञ नागरिकांना कळविण्यात येते कि दि२८/०९/२०२५ रविवार,रोजी शिरड येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप करण्यात येणार आहे तरी शिरड पंचकोषितील सर्व गरजु नागरिकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पैनगंगा मल्टी स्टेट को-आऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष डॉ कमलकिशोर नानारावजी तावडे यांनी केले आहे 

दुर्गा महोत्सव आणि डॉ कमलकिशोर तावडे यांचे बंधू मा, बाळासाहेब उर्फ देवानंद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे तरी सर्वांनी या संधीचा अवश्य फायदा घ्यावा