Ticker

6/recent/ticker-posts

आ. श्वेता ताई महाले पाटील यांच्यावर विश्वास ठेवून,शोएब अहमद शाह यांचा भाजपात प्रवेश



मन्सूर शहा. धोत्रा.भनगोजी चिखली  :- 

तालुक्यात स्वतःची स्वतंत्र छाप निर्माण करणारे युवा नेते शोएब अहमद शाह यांनी आपल्या शेकडो कार्यकत्यांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. हा प्रवेश कार्यक्रम चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेता ताईमहाले यांच्या हस्ते पार पडला.या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. शाह यांच्या प्रवेशामुळे भाजपला मुस्लिम समाजातील तरुणांपर्यंत पोहोच मिळेल, असा विश्वास पक्ष नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष सागर पुरोहित तसेच भाजप अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष नईम सौदागर उपस्थित

होते. त्यांनी शाह यांचे मनःपूर्वक स्वागत करून भावी राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. भाजपच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेता येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या नव्या प्रवेशामुळे भाजपला अधिक बळकटी मिळणार असल्याचे पदाधिकारी म्हणाले.