Ticker

6/recent/ticker-posts

भवाड्यात जलोषाने वृक्ष लागवड संपन्न



भवाडा प्रतिनिधी पी के गावीत

         स्वदेश फाउंडेशन आणि युवाक्रांती मंडळ व ग्रुप ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यामाने 316 वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये अशोक,मोरपंखी व आकर्षित इ. अशा झाडांचा समावेश आहे. स्वदेश फाऊडेशन यांच्या संकल्पनेतून युवाक्रांती मंडळाने संपूर्ण गावाचा सर्वे केला व नंतर कोणत्या ठिकाणी कोणतं झाड लागवड करता येईल हे ठरवले.

            मोठ्या प्रमाणात झाडांची तोड होत आहे. हे लक्षात घेता आणि अशोकच झाड हेच का? हे ही युवाक्रंती मंडळांच्या निदर्शनात आले की, काही ठिकाणी शेती असल्या कारणाने कुठल्याही प्रकारचे शेतीला अडचण येणार नाही. या उद्देशाने अशोक झाड ठरवण्यात आले.

              युवा क्रांतीने गावात सगळ्यांना झाडाचे महत्व पटवून सांगितले. अशाच प्रकारे युवा क्रांतीने आवाहन केले आहे की, प्रत्येक वर्षी वृक्ष लागवड हे मोठ्या प्रमाणावर केले जाईल.