बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय,भाषा शिकता येणार असून त्यांचे ज्ञान समृद्ध होईल. मातृभाषेचा सन्मान करत असताना अन्य भाषा मधील देखील चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांनी शिकल्या पाहिजेत. अखंड वाचन केले पाहिजे यातून आपले ज्ञान समृद्ध बनते ,असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्री सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केली.
श्री हनुमानगिरी हायस्कूल जुनियर कॉलेज तसेच इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदी सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते.प्रास्ताविक सौ एस. जे. लाड यांनी केले. श्री. लहारे सर व प्रा. जे. बी. जाधव यांनी आपल्या मनोगते व्यक्त केली.हिंदी दिवसानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत त्याचबरोबर काव्य वाचन स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले ,अशा सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली.
संस्थेचे सचिव श्री मोहनराव जाधव, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास संचालक श्री विश्वनाथराव जाधव, श्री एस. आर.पाटील सर, प्राचार्य डी.एन. गोफने, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नीलम खटावकर, श्री मोहनराव गुरव,विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin