Ticker

6/recent/ticker-posts

श्री सेवागिरी महाराजांच्या जीवनावरील मालिका लवकरच छोट्या पडद्यावर



 बुध  दि. [प्रकाश राजेघाटगे ]   

संत बाळूमामा  यांच्या जीवनावर आधारित कलर्स मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय सिरिअल बाळूमामाचे निमति राकेश राऊत यांनी पुसेगाव येथे श्री सेवागिरी मंदिरात नठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज, देवस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व सर्व विश्वस्तांची भेट घेऊन श्री सेवागिरी महाराज यांच्या जीवनावर सिरिअल बनविण्याबाबतची चर्चा केली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सेवागिरी महाराजांच्या जीवनावरील कार्याला उजाळा मिळेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

यावेळी राकेश राऊत म्हणाले, महाराजांवर एखाद्या दूरदर्शन वाहिनीवर सलग दोन-तीन वर्षे चालेल अशी नालिका निर्माण होऊ शकते असा विचार माझ्या मनात २०१८ मध्येच आला होता; परंतु त्यावेळी कोणीही साथ दिली नाही. त्यानंतर संत बाळूमामा यांच्यावरील मालिकेचे पायलट एपिसोड केले.

सुरुवातीला काही वाहिन्यांनी ते रिजेक्ट केले. त्यावर उपाय म्हणजे सद्यस्थितीत लोकांची मागणी, त्यांची आवड, याला अनुसरून कथेचे योग्य सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत, त्यामध्ये सुधारणा करत, पुन्हा प्रयत्न केल्यावर यश मिळाले. दूरदर्शन वाहिन्यांवरील आवडत्या मालिकांची व्याप्ती मोठी असून त्यामधून कोणत्याही गोष्टी अथवा व्यक्तीचा प्रचार व प्रसार अगदी जगभर होऊ शकतो असे नमूद करत पुणे-मुंबई स्थित  सेवागिरी महाराजांचे भक्तगण यांनीही महाराजांच्या जीवनावर अशी अभूतपूर्व मालिका तयार करावी असे वारंवार सांगितले असल्याचे राउत यांनी सांगितले. यासाठीच्या पायलेट एपिसोडसाठी अशा भक्तांचे सहकार्य लाभले तर नक्कीच कोणत्यातरी

मोठ्या लोकप्रिय वाहिनीवर आपली श्री सेवागिरी महाराज मालिका देखील झळकेल व घराघरात पोहोचेल व श्री सेवागिरी महाराजांच्या कार्याचा डंका सर्वत्र पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी देवस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव , ग्रामपंचायत पुसेगावचे सरपंच  विशाल जाधव ,सदस्य सूरज जाधव, विश्वस्त संतोष वाघ, बाळासाहेब जाधव, रणधीरशेठ जाधव आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मनोज राऊत यांचा मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराजांच्या हस्ते महाराजांच्या मंत्रोच्चाराची शाल व त्यांचे ग्रंथ देऊन उचित सत्कार करण्यात आला.                             

उत्क्रांती शारदोत्सव मंडळाकडून १ लाख ५१ हजार...

विशेष म्हणजे पहिला पायलट एपिसोड तयार करण्यासाठी पुसेगाव येथील काही नवरात्रोत्सव मंडळांनी पुढाकार घेण्याचे ठरवले असून येथील उत्क्रांती शारदोत्सव मंडळाचे अध्यक्ष संदीप पोपटराव जाधव यांनी १ लाख ५१ हजारांची मदत करणार असल्याचे यावेळी जाहीर केले.            

    देवस्थान ट्रस्टकडून संपूर्ण सहकार्य...

उत्क्रांती शारदोत्सव मंडळाच्या पावलावर पाऊल ठेवत इतरही गणेश व नवरात्र उत्सव नंडळे मालिकेच्या निर्मितीमध्ये सक्रियपणे मदत करतील, श्री सेवागिरी नहाराजांवरील श्रद्धा व प्रेमापोटी या मंडळाबरोबरच अनेक लोक वैयक्तिकरित्या सहकार्य करायला तयार झाले असून या मालिकेच्या सादरीकरणातील संपूर्ण कालावधीत देवस्थान ट्रस्टकडून देखील निर्मात्यांना सहकार्य करायला आम्ही कमी पडणार नाही असे देवस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले.  

भक्तांच्या भावनांचे फलित...

काही महिन्यांपासून पुसेगाव येथे दर गुरुवारी सायंकाळी सात वाजता श्री सेवागिरी महाराजांच्या महाआरतीचे आयोजन केले जात असून पंचक्रोशीतील अनेक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. प्रत्येक अमावस्येला असो तसाच आता दर गुरुवारी देखील महाआरतीनंतर महाप्रसाद होतो. मागील महिन्यातील अशाच एका महाआरती दरम्यान काही जणांनी महाराजांच्या जीवन कार्यावर एखादो टी.व्ही. मालिका निघावी अशी भावना व्यक्त केली होती. आणि त्याचेच फलित म्हणजे जणू महाराजांचा आशीर्वादच व त्यांनी आदेश दिल्याप्रमाणेच राकेश राऊत यांनी महाराजांच्या मंदिरात होऊन श्री सेवागिरी मालिका तयार करण्याबाबत मनोगत व्यक्त केले.