अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड शहरातील बीड-अंबड रोडवर दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी,रविवारी संध्याकाळी साधारण ५:३० ते ६.०० वा अपघाताची घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार,Pick-up (MH २८ AB २१९५) हे वाहन अंबडकडून जात असताना अचानक बीडकडे वळण घेतले.त्या वेळी जालना वरून बीडकडे जाणारी मोटारसायकल (MH २१ AC ६६६७) याला जोरदार धडक बसली.
या अपघातात मोटारसायकलस्वाराच्या डोक्याला मार लागून तो जखमी झाला आहे.तसेच त्यांच्या मोटारसायकलचे आणि मोबाईल फोनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून घटनेनंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.





Social Plugin