Ticker

6/recent/ticker-posts

अंबड-घनसावंगी पोलीस पाटील भरती परीक्षा उद्या; प्रशासनाचा पारदर्शकतेचा निर्धार



*सीसीटीव्ही,वेबकास्टिंग,व्हिडिओग्राफी,भरारी पथके आणि पोलीस बंदोबस्ताची काटेकोर तयारी*

अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

 अंबड उपविभागातील पोलीस पाटील पदभरती परीक्षा २०२५ उद्या,रविवार दि.१२ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडणार असून प्रशासनाने या परीक्षेसाठी भक्कम आणि पारदर्शक यंत्रणा उभी केली आहे.अंबड व घनसावंगी तालुक्यांतील एकूण १८३ रिक्त पदांसाठी आयोजित या परीक्षेला १८६९ उमेदवार सहभागी होणार आहेत.परीक्षेचे आयोजन जालना येथील सहा केंद्रांवर करण्यात आले असून,संपूर्ण प्रक्रिया निःपक्षपाती,सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडेल,अशी माहिती अंबडचे तहसीलदार तथा पोलीस पाटील भरती समिती सचिव विजय चव्हाण यांनी दिली.

प्रशासनाने परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून कडक उपाययोजना केल्या आहेत सीसीटीव्ही आणि थेट वेबकास्टिंग सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.उमेदवारांची व्हिडिओग्राफी परीक्षा हॉलमध्ये प्रवेशापासून परीक्षेच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक उमेदवाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल.भरारी पथके अचानक तपासणीसाठी विशेष पथके नियुक्त. पोलीस बंदोबस्त प्रत्येक केंद्रावर मजबूत पोलीस सुरक्षा व्यवस्था.नियंत्रण व देखरेख:संपूर्ण प्रक्रिया जिल्हाधिकारी जालना आणि उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या थेट देखरेखीखाली पार पडणार आहे.

उमेदवारांना आणि पालकांना प्रशासनाचे आवाहन

भरती प्रक्रिया फक्त गुणवत्तेच्या आधारावरच होणार आहे.कोणत्याही व्यक्तीने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवल्यास त्यावर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट आवाहन तहसीलदार चव्हाण यांनी केले आहे.कोणताही उमेदवार कॉपी,तोतयागिरी, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर किंवा इतर गैरप्रकार करताना आढळल्यास त्याच्यावर ‘महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम १९८२ नुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.

तसेच भारतीय दंड संहिता कलम ४१९,४२०, ४६५,४६८, आणि १२०(ब) अंतर्गत कारवाई होईल.गैरप्रकार सिद्ध झाल्यास,संबंधित उमेदवाराला शासकीय भरतीत कायमस्वरूपी अपात्र ठरवून काळ्या यादीत (Blacklist) समाविष्ट करण्यात येईल.प्रामाणिक उमेदवारांचे रक्षण हेच प्रशासनाचे ध्येय विजय चव्हाण प्रशासनाचा उद्देश प्रामाणिक,पात्र आणि गुणवंत उमेदवारांना न्याय मिळवून देणे हाच आहे. नागरिक आणि माध्यमांनी सहकार्य केल्यास ही भरती प्रक्रिया आदर्श ठरेल असे तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले.