Ticker

6/recent/ticker-posts

मराठवाड्याचे आराध्य दैवत श्री मत्स्योदरी देवीच्या यात्रे निमीत्त आय.टी.आय संस्थेचे विशेष शिबीर



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

मराठवाडयाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मत्स्योदरी देवी नवरात्र महोत्सवा दरम्यान भाविकांच्या दर्शन रांगासह इतर विविध कामांचे नियोजन करण्यासाठी येथील महर्षी कणाद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे दरवर्षीप्रमाणे विशेष सेवा योजना शिबिर घटस्थापनेपासून सुरू झाले आहे.

यामुळे यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी  प्रशासनाला मोठी मदत होत असते.दि २२ सप्टेंबर घटस्थापनेपासून या सेवा योजना विशेष शिबिरास प्रारंभ करण्यात आला.मत्स्योदरी देवी मंदिर परिसरात गाभाऱ्यास संपूर्ण परिसरातील दर्शन रांगा सुरळीत करणे,विशेष दर्शन रांगा,मुलांचे नवस फेडणे अशा विविध ठिकाणी विद्यार्थी  स्वयंसेवकांची मदत घेण्यात येत आहे.भाविक  आल्यापासून तर दर्शन करून बाहेर पडेपर्यंत आय.टी.आय.मधील NSS चे स्वयंसेवक सोइच्छा  हिरारीने सकाळी ५.३० पासून सायंकाळी ९ वाजेपर्यंत मदत करत असतात. 

सायंकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी वकृत्व स्पर्धा,काव्यवाचन स्पर्धा,गीत गायन स्पर्धा,तसेच बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते.२८ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर या दोन दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

प्राचार्य देविदास राठोड यांनी २००५ पासून सुरू केलेल्या या विशेष शिबिराची परंपरा आजतागायत आय.टी.आय.अंबड चे NSS चे विद्यार्थी आनंदाने पुढे चालवत आहेत,अशी माहिती NSS चे कार्यक्रमाधिकारी प्रा.संतोष दहयाळकर यांनी दिली.या प्रसंगी स्वच्छता सप्ताह अंतर्गत NSS च्या स्वयंसेवकांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यासाठी हिरारीने सहभाग घेतला.

या शिबिरास खासदार कल्याण काळे,आमदार नारायण कुचे,माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल,माजी सभापती प्रकाशतात्या बोरडे,माजी प्राचार्य भागवत कटारे,कैलास नाना भोरे,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गोवर्धन भोरे,उद्योजक सुधीर खेडेकर,एस एल तोडकर,आर जी थोरे,पत्रकार अशोक डोरले आदींनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढविले.

या विद्यार्थी स्वयंसेवकांसाठी SRJ कंपनी च्या वतीने ट्रॅक सूटची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राचार्य राजेश धानोरकर,संस्थानचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांच्या हस्ते शिबीराचा शुभारंभ व ट्रॅकसूटचे वाटप करण्यात आले. 

शिबीर यशस्वीतेसाठी संस्थेचे प्राचार्य राजेश धानोरकर,गट निदेशक आर जी डोईजड,एस जी वांगे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी संतोष दहयाळकर,एस ए भोजने,के के मगर,एन बी चौधरी,सतिष भालगावकर,दत्ताभाऊ चौधरी,अजय बुंदेलखंडे, योगेश आठवले,बाबासाहेब खरात हे कर्मचारी स्वयंसेवकासोबत शिबीर यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत.