मालेगाव प्रतिनिधी
मालेगाव :- दरवर्षी पेक्षाही यावर्षी भरपूर प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सतत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन व इतर पिकांचे खूप जास्त नुकसान झालेले आहे तसेच वाढतीमंगाई,कर्जबाजारीपणा, उत्पन्नात घट अशा समस्येचा सामना करत शेतकरी राजांनी आपल्या शेतामध्ये मोठ्या मेहनतीने व अपेक्षेने शेत पिकाची पेरणी केली असताना ऐन वेळेला पीक हातात येण्याच्या परिस्थिती मध्ये निसर्गाचा संकट खोपला आणि अनेक ठिकाणी सततमुसळधार पाऊस व ढगफुटीमुळे लाखो शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे तसेच नदी- नाल्याकाठी असलेल्या गोर-, गरीब शेतकऱ्यांचे शेत वाहून गेल्यामुळे शेतकरी हा खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शासनाने खंबीरपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहून कुठल्याही निकषाच्या अटी न लावता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून गोरगरीब शेतकऱ्यांना मोठया मनाने मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जावेद भवानीवाले (मेडशी)यांच्याकडून होता आहे





Social Plugin