Ticker

6/recent/ticker-posts

कलगाव येथे पारंपरिक पद्धतीने विजयादशमी उत्सव साजरा

 


अक्षय काळबांडे ग्रामीण  प्रतिनिधी कलगाव 

दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे पारंपरिक पद्धतीने विजयादशमी साठी श्री मोहिते पाटील यांच्या घरून काळबांडे यांच्या शेतात वर्षपरंपरे नुसार सीमोल्लंघनसाठी यावर्षी श्री मोहिते यांचा मुलगा चि रोहन मोहिते याला मान देण्यात आला. यामुळे शेतात गेल्यावर शमीच्या झाडावर शत्र ठेऊन पूजा करता.आणि सोने लुटतात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा सण साजरा केला जातो. दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, असे मानले जाते.पारंपरिक पद्धतीनुसार, दसऱ्याच्या दिवशी नवीन कामांची सुरुवात केली जाते. शस्त्रपूजा, वाहनपूजा केली जाते. व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, सर्वच जण या दिवशी आपापल्या साधनांची पूजा करतात. महाराष्ट्रात दसऱ्याला “सोनं वाटणे” ही प्रथा आहे. अपराजिता (झेंडू/आघाडा) वनस्पतीची पाने “सोनं” मानून ती एकमेकांना देऊन शुभेच्छा दिल्या जातात. नव तरुणाने नेतृत्व केल्याने तरुणाई आनंदित होती . या उत्सवासाठी गावातील जेष्ठ नागरिक तरुण उपस्थित होते