Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी किसान सभेतर्फे लोंढे यांचा सत्कार



 मालेगाव ता 6- राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेतर्फे महाराष्ट्र राज्य ईतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय तथा तत्कालीन उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांचे स्विय सहाय्यक शरद लोंढे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला 

त्याचा व त्यांची पत्नी सौ विजया लोंढे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांनी मालेगाव - अकोला राज्य महामार्गावरील हॉटेल सरपंच येथे केला 

   यावेळी तेजस लोंढे , कविश लोंढे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मालेगाव तालुका अध्यक्ष जावेद भवानिवाले, अमर गाभणे,मेडशी चे माजी उपसपंच शेख रजाकभाई , शंकर ईरतकर, रवी बळी, कपिल भालेराव, कीर्तीकुमार गावंडे आदी उपस्थित होते 

 यावेळी प्रा गाभणे यांनी लोंढे यांच्या कार्यप्रणालीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. लोंढे कार्यकर्त्यांची कामे जलद गतीने करायचे असे ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जावेद भवानिवाले यांनी तर आभारप्रदर्शन अमर गाभणे यांनी केले