अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंकुशराव टोपे महाविद्यालयात प्रथमच आयोजित कनिष्ठ महाविद्यालयीन जिल्हास्तरीय कर्मयोगी अंकुशराव टोपे वाद विवाद स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा माननीय डॉ.बी.आर गायकवाड (प्रशासकीय अधिकारी म.शि.सं.जालना) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.डॉ.बी.आर.गायकवाड यांनी उपस्थित स्पर्धक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण सातत्याने वाचन,चिंतन व नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.स्पर्धकांनी चेहऱ्यावरील हवभाव,बोलण्याची लकब,श्रोत्यांना भावेल अशा भाषेचा वापर करावा असा मोलाचा सल्ला दिला.
सर्व विजेत्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब गजहंस,प्राचार्य डॉ.शकील खान,उपप्राचार्य डॉ.संजय पाटील,उपप्राचार्य प्रा.पांडुरंग खोजे,श्री.मधुकर शिंनगारे,श्री.सुरेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते वादविवाद स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.यामध्ये वैयक्तिक सर्वप्रथम विजेता श्री यश सुरेश शिरसाठ (अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना) सर्व द्वितीय कु.शिवांजली नाथा घुले (मत्स्योदरी महाविद्यालय अंबड) सर्व तृतीय कु.आरशदराजा आजम शेख (बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना) यांना रोख रक्कम अनुक्रमे ५००१,३००१,२००१,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी सांघिक विजेता मत्स्योदरी महाविद्यालय अंबड संघाला कायमस्वरूपी ढाल देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शंकर तिकांडे यांनी तर आभार प्रा.प्रमोद भांदरगे यांनी केले.
कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा.रामप्रसाद भालेकर, प्रा.महादेव माने,प्रा.दत्ता पटाईत, प्रा.मोहन शिंदे, प्रा.दादासाहेब शिंदे,प्रा.बाळासाहेब पवार, प्रा.शोकेत शेख,प्रा.विजयकुमार कुमठेकर,प्रा.प्रकाश वाजूळे,प्रा.सुदर्शन तारख,प्रा. कपिल घोलप,प्रा.बालाजी सूर्यवंशी,प्रा.गणेश परदेशी,प्रा.बाळासाहेब लुंगाडे,प्रा.गणेश गुंजाळ, प्रा.अंकुश गडदे,प्रा.अविनाश पवार,प्रा.नागवे, प्रा.चंद्रकांत लाटेकर,प्रा.संगीता गाभूड,प्रा.शुभांगी राऊत,प्रा.वैशाली मगरे,प्रा.शोभना भालेराव,प्रा.सपना शहाणे,प्रा.सुमाआढाव,प्रा.श्रद्धा कुलकर्णी व महाविद्यालयीन कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.





Social Plugin