अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील महसुल विभागाचे मंडळ अधिकारी प्रविण गजरे याचा मनमानी कारभार सुरू असुन वारसाचे फेरफार करतांना आर्थिक देवाण घेवाण करणार्या शेतकऱ्यांचे तातडीने फेर घेतले जातात व चिरीमिरी न देणार्याचे फेरफार कलम ८५ ची आर्डर तहसिलदार यांची नसल्यामुळे फेर रद्द केल्याचे निदर्शनास आले असुन आशा प्रकारची तक्रार पुराव्यानिशी संदीप लक्ष्मण कटुंले यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली असुन त्याच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
दि.३० आक्टोबर रोजी तहसिलदार घनसावंगी यांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की कुभांर पिपळगाव चे मडंळ अधिकारी प्रविण गजरे यांनी मौजे गुजं बु.शिवारातील गट क्र ६१८/मधील फेर क्र १९४० हा सबधींत मंडळ अधिकारी यांनी सबधीताकडुन आर्थिक देवाण घेवाण करुन वाटणीपत्राचा फेर मजुंर केला.मात्र मौजे कुंभार पिंपळगाव शिवारातील गट क्र.४११ मधील नोदंवलेला फेर क्रमांक ४७९७ हा कलम ८५ चे आदेश नसल्याचे कारण दाखवुन ना मंजुर केला.
अशा प्रकारे अनेक फेरफार आर्थिक देवाण घेवाण करणाऱ्या शेतकऱ्यांचे फेरफार मंजुर केले जे शेतकरी दुष्काळाने परेशान आहेत आणी पैसे देऊ शकत नाहीत.अशा अनेक शेतकरी वर्गाला वेठीस धरत आहेत त्यामुळे या मडंळ अधिकारी यांनी कुंभार पिंपळगाव शिवारातील अनेक प्रकरणात मोठ्या प्रमाणावर अनियमितता केलेली असुन उपविभागीय अधिकारी ऊमाकात पारधी यांनी तात्काळ पदभार काढुन घेऊन त्यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख संदीप कटुंले यांनी केली आहे.





Social Plugin