Ticker

6/recent/ticker-posts

पनवेल तालुक्यातील फार्महाऊसवर घडली धक्कादायक घटना..



विशाल कांबळे, ग्रामीण प्रतिनिधी 

 पनवेल तालुक्यातील धानसर गावातील प्रसिद्ध रीयांश फार्महाऊस येथे घडलेल्या अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटनेचा तळोजा पोलिसांनी उलघडा केला आहे. फार्महाऊस मधील बाथरूममध्ये लपून ठेवलेल्या कॅमेरा द्वारे विडिओ शुट करणारा आरोपी मनोज चौधरी रा . रांजणपाडा खारघर याला पोलिसांनी अटक केली आहे पोलिस तपासात उघड झालेल्या माहिती नुसार मनोज चौधरीने बाथरूममध्ये कॅमेरा बसवून महिलांचे खासगी विडिओ शुट केले होते, त्यांच्याकडुन दोन मोबाईल फोन जप्त केले असून एका मध्ये ५० पेक्षा जास्त विडिओ सापडल्याची माहिती समोर आली आहे तर दुसऱ्या मोबाईल मधील विडिओ त्याने डिलीट केले आहेत. दरम्यान हे विडिओ इतरात्र शेअर केले आहेत का ? या कृत्यात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास तळोजा पोलिस करत आहेत