Ticker

6/recent/ticker-posts

दिनेश फडतरेंच्या आठवकल्लोळला कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

मंचर जि.पुणे येथील कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानकडून दरवर्षी मराठी साहित्यातील वेगवेगळ्या विभागासाठी पुरस्कार दिले जातात..यावर्षी ललित साहित्य विभागात पुसेगाव जि. सातारा येथील लेखक दिनेश फडतरे यांच्या संस्कृती प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या आठवकल्लोळ या ललित लेख संग्रहाला अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताजी पायमोडे यांनी जाहीर केले आहे ..आठवकल्लोळ या ललित लेख संग्रहाला मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे..याआधी खेडभाळवणीच्या ज्ञानवर्धिनी वाचनालयाचा पुरस्कार , मराठी वाडःमय परिषद बडोदा गुजरातचा पुरस्कार या संग्रहाला प्राप्त आहेत..

दिनेश फडतरे यांचा आठवकल्लोळ हा ललित लेख संग्रह रसिक वाचकांच्या पसंतीस उतरत आहे..सन्मान चिन्ह, प्रशस्तिपत्र, पुष्पगुच्छ, शाल असं पुरस्काराचं स्वरुप आहे..रविवार दि. २६/१०/२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मंचर येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे ...या पुरस्काराबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे..

अ. भा.मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डाॅ.सुरेश जाधव, उपसरपंच विशाल जाधव, ग्रामस्थ व मित्रपरिवार पुसेगाव तसेच अनेक साहित्यिकांनी श्री दिनेश फडतरे यांचे अभिनंदन केले