Ticker

6/recent/ticker-posts

कातळगेवाडीकरांचे प्रेम न विसरण्याजोगे : आ. महेशदादा शिंदे

     


   बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे]

 खटाव तालुक्यातील कातळगेवाडी गावाने आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकीपासून आमदारकीपर्यंत नेहमीच मोलाची साथ दिली आहे.आपण आमदार केले म्हणूनच मी या भागाचा विकास केला पाणी आणले. आता नोकरी उद्योगासाठी पुण्या मुंबईला जाणारी पोरं तयार करू नका. तर तर गावात राहूनच आई वडिलांची सेवा करत मुंबईच्या हजारपटीने कमवतील अशी पिढी तयार करण्याची ताकद आपल्यात आहे. मागील काळ नाकर्तेपणाचा होता आपल्याला पर्याय नव्हता आता आहे असे मत कोरेगाव खटावचे आ. महेशदादा शिंदे यांनी व्यक्त केले. कातळगेवाडी  येथे ग्रामस्थांच्यावतीने आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वडूज बाजार समितीचे माजी सभापती आण्णासाहेब वलेकर, सांगली बँकेचे चेअरमन चंद्रकांत जाधव, दयानंद भारती, महादेव जाधव, सरपंच जगन्नाथ सावंत, उपसरपंच भरत मोरे, ग्रा. प.सदस्या रंजना जाधव, सत्वशिला जाधव, ज्ञानेश्वर जाधव, गोपीचंद जाधव, राजुशेठ पन्हाळे, चंद्रकांत खुस्पे, शिवाजी सुर्यवंशी, मनोहर जाधव, बबन जाधव, अशोक केंजळे, तानाजी जगदाळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

        पुढे बोलताना आ. महेश शिंदे म्हणाले की, आपण मागील ५ वर्षात मतदार संघात बरीच विकास कामे केली पिण्याच्या पाण्या बरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय. उर्वरीत राहिलेल्या विकास कामावर लक्ष केंद्रित केले असून सैदैव मी मतदार संघातच असतो. लागेल तेवढा निधी आणून आपला मतदार संघ सुजलाम सुफलाम बघण्यासारखं करणार असल्याचे अभिवचन दिले व पुढील काळात पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आव्हान केले. महादेव जाधव म्हणाले की, आमदारसाहेब पाणी प्रश्नाबरोबर मराठी शाळेचा प्रश्न, रस्ते, बंदिस्त गटार असे प्रश्न तुम्ही सोडविले परंतू गाव परिसरातील विकासाला तुम्ही ताकद द्यावी. तर तसेच जिहे कठापूर अंतर्गत स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार उपसासिंचन योजना लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावी म्हणजे या भागाचा शेती पाणी प्रश्न कायम स्वरूपी संपेल. गाव तुमच्या पाठीशी पूर्णपणे उभा राहिल अशी ग्वाही दिली. दयानंद भारती यांनी ही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन महादेव जाधव यांनी केले तर आभार गोपीचंद जाधव यांनी मानले. कार्यक्रमास गावातील आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला ग्रामस्थ, तरुण वर्ग बहुसंख्येनी उपस्थित होता.

 दरम्यान खटाव बीट अंतर्गत कातळगेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी रनिंग स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या दुर्वश महादेव जाधव, राधिका गजानन शिंदे, श्रेयश सोपान जाधव, शिवम चंद्रकांत जाधव या विद्यार्थ्यांचा आ. महेशदादा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.