Ticker

6/recent/ticker-posts

नागरतास जागृती मैदान जेतवन परिसर येथे श्रामणेर शिबीर ला सुरवात





वाशीम प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले


मालेगाव : तालुक्यातील नागरतास येथे त्रिरत्न बुद्ध विहार जेतवन परिसर ०७ ऑक्टोबर २०२५ मंगळवार रोजी सामनेर ला सुरवात करण्यात आली.
   
   तथागत गौतम बुद्ध यांना वंदन करण्यात आले .श्रामणेर शिबीर दहा दिवसाचे आहे आणि श्रामणेर शिबिर मध्ये  प्रशिक्षण आणि दिक्षा घेण्यासाठी विविध ठिकाणांहून सहभागी झालेले आहेत. शिबिराचा पहिला दिवस त्या दिवसाचे पहिले भिकू संघाला भोजनदान महाउपासक शाहीर संजय इंगळे यांच्या घरा समोर रांगोळी व फुले टाकण्यात आले होते. त्यानी १२  वाजता बारा भिकू संघाला भोजन दान देण्यात आले.नागरतास जागृती मैदान जेतवन परिसर येथे भिकू संघ आणि उपासक आणि उपासिका यांनी  बौद्ध पुजा पाठ, वंदना घेऊन आज अश्विनी पौर्णिमेच्या पर्वावर अष्टशील ग्रहण करून आषाढ, अश्विनी पौर्णिमा साजरी केली.तसेच मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका यावेळी उपस्थित होते.