Ticker

6/recent/ticker-posts

आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करीता प्रभागांमध्‍ये राखीव जागांचे वाटप करण्‍याकरिता आरक्षण सोडतीचा यशस्वीपणे पार पडले


प्रतिनिधी सोमनाथ काळेआळंदी 

आज दि.08/10/2025 रोजी दुपारी 01.00 वाजता आळंदी नगरपरिषद कार्यालयाच्या पहिल्‍या मजल्यावरील सभागृहात आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करीता प्रभागांमध्‍ये राखीव जागांचे वाटप करण्‍याकरिता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आलेला होता. सदर कार्यक्रम पार पाडण्‍याकरिता मा. जिल्हाधिकारी पुणे यांचेकडून मा.उपविभागीय अधिकारी, शिरुर, उपविभाग, शिरुर यांची दिनांक 07/10/2025 रोजीच्‍या आदेशान्‍वये नियुक्‍ती करण्‍यात आलेली होती. 

उपविभागीय अधिकारी, शिरुर, उपविभाग, शिरुर यांनी सभागृहामध्‍ये उपस्थित असलेल्या सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व आळंदी शहरातील नागरिक यांचे स्वागत केले व आरक्षण सोडतीच्‍या कार्यक्रमाला सुरुवात केली.

प्रथमतः आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हा महाराष्‍ट्र नगरपरिषदा (प्रभागांमध्‍ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्‍याची पध्‍दत) नियम 2021 तसेच मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांचेकडील आदेश दिनांक 03/10/2025 या नुसार पार पाडण्‍यात येणार असल्‍याची माहिती उपविभागीय अधिकारी यांनी उपस्थितांना सभागृहामध्‍ये दिली. तसेच सदर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पाडण्‍याकरिता मा. विभागीय आयुक्त पुणे विभाग यांनी मंजूरी दिलेले दिनांक 11 जुलै 2025 चे राजपत्र (ज्यामध्‍ये नगरपरिषदेची एकूण लोकसंख्‍या व प्रवर्ग निहाय राखीव जागांची संख्‍या  यांना मंजूरी प्रदान करण्‍यात आलेली आहे) विचारात घेतले जाणार आहे असेही सभागृहात उपस्थित असलेल्या नागरीकांना सांगितले. 

प्रभागांमधील आरक्षण निश्चिती करताना चिठ्ठया टाकून जागांचे आरक्षण निश्चित करण्‍यात येणार असल्याबाबत उपस्थितांना माहिती देण्‍यात आली.  

सर्व प्रथम प्रभागांमधील राखीव जागांचे वाटप करण्‍याचे नियम 2021 मधील सूचनेनुसार अनुसूचित जातीचे राखीव प्रभाग निश्चित करण्‍यासाठी ज्या प्रभागातील  अनुसूचित जातीच्‍या लोकसंख्‍येची टक्केवारी त्या प्रभागातील एकूण लोकसंख्‍येच्‍या तूलनेत सर्वाधिक असेल असे प्रभाग क्र. २ व प्रभाग क्र. १० हे दोन प्रभाग अनुसूचित जातीच्‍या प्रवर्गाकरिता राखीव ठेवण्‍यात आले. 

अनुसूचित जातीच्‍या २ प्रभागापैकी अनुसूचित जाती महिला करिता १ जागेची सोडत काढण्‍यात आली यामध्‍ये प्रभाग क्र. २ व प्रभाग क्र. १० अशा दोन चिठ्या टाकण्‍यात आल्‍या. त्‍यापैकी एक चिठ्ठी काढण्‍यात आली यामध्‍ये प्रभाग क्र. २अ  करिता अनुसूचित जाती (महिला) हे आरक्षण राखीव ठेवण्‍यात आले व दुसरी अनुसूचित जातीची जागा प्रभाग क्र. १० मध्‍ये राखीव ठेवण्‍यात आली. 

त्‍यानंतर नागरीकांच्‍या मागास प्रवर्गातील जागांचे वाटप हे प्रभागांमधील राखीव जागांचे वाटप करण्‍याचे नियम 2021 दिनांक 15 डिसेंबर 2021 मधील तरतूदीनूसार करण्‍यात येणार असल्‍याचे उपविभागीय अधिकारी यांनी सभागृहामध्‍ये सांगितले. नागरीकांचा मागास प्रवर्ग याकरिता एकूण 06 जागा राखीव ठेवण्‍याच्‍या आहेत. दिनांक 15 डिसेंबर 2021 च्‍या अधिसूचने मधील तरतूदीनूसार ज्या ठिकाणी तीन सदस्‍यांचा प्रभाग असेल त्या प्रभागातील एक जागा नागरीकांच्‍या मागास प्रवर्गाकरीता थेट नेमून  देण्‍यात यावी अशी तरतूद असल्‍यामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील 01 जागा थेट नागरीकांचा मागास प्रवर्ग याकरीता आरक्षित होत असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले.  उर्वरित 05 जागांचे आरक्षण निश्चित करण्‍याकरिता अनुसूचित जाती यांच्‍याकरिता प्रभाग क्र. 02 आणि प्रभाग क्र. 10 (सदर प्रभाग क्र. 10 मध्‍ये 01 जागा थेट नागरीकांचा मागासप्रवर्गाकरिता नेमून दिलेली असल्‍याने) वगळून उर्वरित प्रभाग विचारात घेतले जाणार आहेत असे उपविभागीय अधिकारी यांनी सभागृहामध्‍ये सांगितले. यानंतर नमूद प्रभागाच्‍या चिठ्ठया घेवून त्या चिठ्ठया एका पारदर्शक बरणीमध्‍ये समक्ष ठेवण्‍यात आल्या. नंतर बरणीचे झाकण बंद करून चिठ्ठयांची सरमिसळ करण्‍यात आली. तदनंतर कुमार/कुमारी  स्‍वरा अजित भनगे याला बोलावून त्‍यातून  05  चिठ्ठया बरणीचे बाहेर काढण्‍यासाठी सांगण्‍यात आले. 

             कुमार/कुमारी  स्‍वरा अजित भनगे यांनी जी प्रथम चिठ्ठी काढली ती प्रभाग क्रमांक  5 अशी निघाली, त्‍यामुळे प्रभाग क्रमांक  5 हा प्रभाग नागरीकांचा मागास प्रवर्ग या करिता आरक्षित झाल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केले. तदनंतर सदर चिठ्ठी बाजूला ठेवण्‍यात आली. कुमार/कुमारी   स्‍वरा अजित भनगे यांनी जी दुसरी  चिठ्ठी काढली ती प्रभाग क्रमांक  1  अशी निघाली, त्‍यामुळे प्रभाग क्रमांक 1 हा प्रभाग नागरीकांचा मागास प्रवर्ग या करिता आरक्षित झाल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केले. तदनंतर सदर चिठ्ठी बाजूला ठेवण्‍यात आली. कुमार/कुमारी   स्‍वरा अजित भनगे यांनी जी तिसरी चिठ्ठी काढली ती प्रभाग क्रमांक  8 अशी निघाली, त्‍यामुळे प्रभाग क्रमांक  8 हा प्रभाग नागरीकांचा मागास प्रवर्ग  या करिता आरक्षित झाल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केले. तदनंतर सदर चिठ्ठी बाजूला ठेवण्‍यात आली. कुमार/कुमारी   माऊली मारुती साठे  यांनी जी चवथी चिठ्ठी काढली ती प्रभाग क्रमांक  9 अशी निघाली, त्‍यामुळे प्रभाग क्रमांक  9 हा प्रभाग नागरीकांचा मागास प्रवर्ग  या करिता आरक्षित झाल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केले.  तदनंतर सदर चिठ्ठी बाजूला ठेवण्‍यात आली. कुमार/कुमारी   माऊली मारुती साठे   यांनी जी पाचवी चिठ्ठी काढली ती प्रभाग क्रमांक  4 अशी निघाली, त्‍यामुळे प्रभाग क्रमांक  4 हा प्रभाग नागरीकांचा मागास प्रवर्ग  या करिता आरक्षित झाल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केले. तदनंतर सदर चिठ्ठी बाजूला ठेवण्‍यात आली. त्‍यामुळे नागरिकांच्‍या मागास प्रवर्गकरिता प्रभाग क्र. 5, 1, 8, 9, 4, 10 हे प्रभाग निश्‍चीत करण्‍यात आले. 

तदनंतर नागरीकांच्‍या मागास प्रवर्गातील महिलांच्‍या जागेसाठीची सोडत काढण्‍यात आली. नागरीकांचा मागास प्रवर्गाकरिता निश्चित झालेल्या एकूण  06 प्रभागामधून महिलांकरिता आरक्षित 03 जागा निश्चित केल्या जाणार असल्‍याचे उपविभागीय अधिकारी शिरुर  यांनी उपस्थितांना सांगितले. प्रभाग क्र. 10 हा 03 सदस्यांचा असून त्‍या प्रभागात 01 जागा अनुसुचित जातीसाठी राखीव झाली असल्‍याने त्‍या ठिकाणी 01 जागा ना.मा.प्र. (महिला) करिता आरक्षित  ठेवण्‍यात आले व उर्वरित २ जागेसाठी ना.मा.प्र. (महिला) करिता सोडत काढण्‍यात आली. 

नागरीकांच्‍या मागासप्रवर्गाकरिताच्‍या उर्वरित 02 जागांसाठी चिठ्ठया पारदर्शक बरणीमध्‍ये उपस्थितांसमक्ष  ठेवण्‍यात आल्या व त्‍यांची सरमिसळ करण्‍यात आली. तदनंतर कुमार/कुमारी  माऊली मारुती साठे याला बोलावून त्‍यातून एकूण 02 चिठ्ठया बरणीचे बाहेर काढण्‍यासाठी सांगण्‍यात आले.  जी प्रथम चिठ्ठी काढली ती प्रभाग क्रमांक  4 अशी निघाली, त्‍यामुळे प्रभाग क्रमांक  4 मधील 4अ ही जागा नागरीकांचा मागासप्रवर्ग महिला प्रवर्गाकरिता आरक्षित झाल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केले. तदनंतर सदर चिठ्ठी बाजूला ठेवण्‍यात आली. 

  यानंतर कुमार/कुमारी  माऊली मारुती साठे याने जी दुसरी चिठ्ठी काढली ती प्रभाग क्रमांक  1  याची आली, त्‍यामुळे प्रभाग क्रमांक 1अ ही जागा नागरीकांचा मागासप्रवर्ग महिला प्रवर्गाकरिता आरक्षित झाल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केले. तदनंतर सदर चिठ्ठी बाजूला ठेवण्‍यात आली. नागरीकांचा मागासप्रवर्ग करिता प्रभाग क्र. 5, 1, 8, 9, 4, 10 हे प्रभाग आरक्षीत ठेवण्‍यात असून यापैकी नागरीकांचा मागासप्रवर्ग महिला प्रवर्गाकरिता प्रभाग क्र. 4, 1,10 हे प्रभाग राखीव ठेवण्‍यात आले असल्‍याचे उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केले.

  त्‍यानंतर सर्वसाधारण महिला करिता आरक्षण सोडत काढण्‍यात आली. 

सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षण प्रक्रिया केली जाणार असल्‍याचे उपविभागीय अधिकारी यांनी उपस्थितांना सांगितले. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता खालील नमूद केलेप्रमाणे निश्चित झालेले प्रभाग विचारात घेतले जाणार असल्‍याचे उपविभागीय अधिकारी यांनी उपस्थितांना सांगितले. महिलांसाठी जागा निश्चित करताना दिनांक 15 डिसेंबर 2021 च्‍या अधिसूचनेतील खालील दोन सूचना विचारात घेतल्या जाणार असल्‍याचे उपविभागीय अधिकारी यांनी सभागृहामध्‍ये सांगितले.  दोन जागा असलेल्या प्रभागातील एक जागा ही महिलांसाठी राखून ठेवण्‍यात येईल. तीन जागा असलेल्‍या प्रभागातील दोन जागा या महिलांसाठी राखून ठेवण्‍यात येतील. प्रभाग क्र. 10 हा 03 सदस्यांचा असून त्‍या प्रभागात 01 जागा अनुसुचित जातीसाठी राखीव झाली असल्‍याने त्‍या ठिकाणी 01 जागा ना.मा.प्र. (महिला) व 01 जागा सर्वसाधारण महिला करिता आरक्षित होत असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले. दिनांक 15 डिसेंबर 2021 च्‍या अधिसूचनेतील वरील क्र. 1 व 2 चे नियमानुसार एकही जागा महिलांसाठी आरक्षीत नसल्‍याने प्रभाग क्र. 3, 5, 6, 7, 8, 9 हे प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी नेमूण राखीव ठेवण्‍यात आले. 

संपूर्ण 10 प्रभागातील आरक्षणाची स्थिती खालील तक्त्‍या नमूद केल्याप्रमाणे निश्चित झाल्‍याचे सांगून सर्व जागांसाठीचे आरक्षण उपस्थितांसमोर वाचून दाखविण्‍यात आले.


प्रभाग क्र. १अ : ना.मा. प्र. (महिला) 

प्रभाग क्र. १ब : सर्वसाधारण 

प्रभाग क्र. २अ :अ.जा. (महिला)  

प्रभाग क्र. २ब :सर्वसाधारण 

प्रभाग क्र.३अ :सर्वसाधारण (महिला) 

प्रभाग क्र.३ब :सर्वसाधारण 

प्रभाग क्र. ४अ : ना.मा. प्र. (महिला) 

प्रभाग क्र. ४ब : सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५अ : ना.मा. प्र. 

प्रभाग क्र. ५ब : सर्वसाधारण (महिला) 

प्रभाग क्र. ६अ : सर्वसाधारण (महिला) 

प्रभाग क्र. ६ब : सर्वसाधारण 

प्रभाग क्र. ७अ : सर्वसाधारण (महिला) 

प्रभाग क्र. ७ब : सर्वसाधारण 

प्रभाग क्र. ८अ : ना.मा. प्र. 

प्रभाग क्र. ८ब : सर्वसाधारण (महिला) 

प्रभाग क्र. ९अ : ना.मा. प्र. 

प्रभाग क्र. ९ब : सर्वसाधारण (महिला) 

प्रभाग क्र. १०अ : अ.जा.   

प्रभाग क्र. १०ब : ना.मा. प्र. (महिला) 

प्रभाग क्र. १०क: सर्वसाधारण (महिला)