Ticker

6/recent/ticker-posts

पक्षाने संधी दिली तर बोधडी गटात विजयाची हैट्रिक करून दाखवेन.



अर्धापूर प्रतिनिधी/ विश्वराज वाकोडे

      बोधडी आदिवासीनेते माधवराव किरवले यांच्या सुविद्य पत्नी राधाबाई किरवले यांचा दृढविश्वास बोधडी बु जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या नंतर या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ज्येष्ठ दिवंगत नेते माधवरावजी किरवले यांच्या सुविधा पत्नी तथा पंचायत समितीच्या माजी सदस्य राधाबाई किरवले यांनी निवडणूक लढण्याची जोरदार तयारी सुरू केली असून किरवले कुटुंबाचे समाजकार्य व प्रत्येक जाती समूहातील जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता राधाबाई किरवले या बोधडी गटातल्या एकमेव प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.राधाबाई किरवले यांच्या एंट्रीमुळे बोधडी बु गटात राष्ट्रवादी काँग्रेस विजयाची हॅट्रिक करणार असल्याची चर्चा सुरु आहे.बोधडी बु. जिल्हा परिषद गटावर मागील तीन टर्मपासून दिवंगत आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे एकहाती वर्चस्व आहे.हा गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जातो.या वेळेला हा गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.त्यादृष्टीने त्यांचे समर्थक व हितचिंतक मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत. 

माधवराव किरवले यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान राहिलेले आहे.समाजातील उपेक्षित आणि वंचित लोकांसाठी त्यांनी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे शेतकरी शेतमजुरांच्या हितासाठी अनेकदा मोर्चे आंदोलने उपोषण करून सर्वसमावेशक नेतृत्वाची छाप निर्माण केली.त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे या भागात राष्ट्रवादी मजबूत स्थितीत आहे. या गटात आदिवासी मतदार सर्वाधिक असून त्या खालोखाल दलित बंजारा मतदार आहेत.या माधवराव किरवले यांचे पूर्वीपासूनच या समाजात जिव्हाळ्याचे संबंध असल्याने 2007 ला बोधडी बु पंचायत समिती गणातून माधवराव किरवले यांच्या सुविधे पत्नी राधाबाई या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी केलेला विकास, सामाजिक कार्य व सर्व जातीसमूहातील दांडगा जनसंपर्क लक्षात घेता या वेळेला राधाबाई किरवले प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. कपिल नाईक यांनी मला निवडणूक लढण्याची संधी दिली तर निश्चितपणे राष्ट्रवादीचा झेंडा फडकाऊन दाखवेन असा आत्मविश्वास राधाबाई किरवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.