Ticker

6/recent/ticker-posts

सातारा कारागृहातील बंदयांचे आकाश कंदील, पेपर बॅग, फाईलचे प्रशिक्षण पूर्ण



 बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

महाराष्ट्र कारागृह विभागाचे डॉ. श्री सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, श्री योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, श्री सुनील ढमाळ, कारागृह उपमहानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आयडीबीआय आरसेटीच्या माध्यमातून कारागृहातील बंदयांसाठी दिवाळीकरीता आकाश कंदिल तयार करणे, फाईल तयार करणे, पेपर बॅग व एन्वलप तयार करणे इत्यादीचे सहा दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये बंदयांनी विविध रंगांचे कागदी व प्लास्टिकचे आकाश कंदील तयार केले तसेच कागदी पिशव्या फाईल आणि विविध आकाराचे एन्वलप देखील तयार केले. सदरच्या प्रशिक्षणासाठी आयडीबीआय आरसेटीचे डायरेक्टर योगेश रासकर व त्यांच्याकडील प्रशिक्षक श्री बोरगावे सर, श्री निलेश टोकेकर, श्री चंद्रकांत भोसले यांच्या मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सदर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम आज रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाल न्याय मंडळाच्या न्यायाधीश श्रीमती सैंदाणे मॅडम होत्या. त्यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बंदयांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

तसेच इनरव्हील क्लब, सातारा यांच्या माध्यमातून कारागृहातील महिला बंदयांना दिवाळी सणानिमित्त दैनंदिन आवश्यक वापराच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी न्यायाधीश सैंदाणे मॅडम, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, आयडीबीआय आरसेटीचे डायरेक्टर योगेश रासकर, इनरव्हील क्लब अध्यक्ष रूपाली गुजर, स्वरूपा पोरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी टी एस निंबाळकर, अति. वरिष्ठ तुरूंगअधिकारी सतीश कदम, तुरुंग अधिकारी श्रीमती तडाखे, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार मारुती नवघणे, शिपाई प्रेमनाथ वाडेकर, प्रशांत कदम, संदीप बोराटे, संकेत जाधव तसेच सर्व बंदी उपस्थित होते