Ticker

6/recent/ticker-posts

परतूर विधानसभा मतदारसंघात राजकीय भूकंप




प्रतिनिधी -

दीपावली पाडव्याच्या या पवित्र आणि शुभ मुहूर्तावर, जेव्हा अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा होतो, तेव्हा आपण सर्वजण एकत्र आलो आहोत – हीच खरी स्नेहाची, विश्वासाची आणि विकासाची दीपमाळा आहे. हा सण फक्त दिवे लावण्याचा नाही, तर नात्यांना अधिक मजबूत करणारा, एकमेकांच्या मनात विश्वासाची ज्योत प्रज्वलित करणारा आहे. आणि त्याचप्रमाणे, मी परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचा आमदार आणि भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान सेवक म्हणून, गेली अनेक वर्षे आपल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी, आपल्या गावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अविरत काम करत आलो आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री परतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केले

परतूर विधानसभा मतदारसंघात आज मोठा राजकीय भूकंप घडून आला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे शेकडो कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण केली आहे. या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परतूरमध्ये भाजपला मोठे बळ मिळाले आहे. माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पूर्वाश्रमीचे कट्टर जेथलिया समर्थक ज्ञानेश्वर माऊली तनपुरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री शिवाजीराव जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शेकडो वाहनांच्या ताफ्यासह ढोल ताशांच्या गजरात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाचा रुमाल घालून प्रवेश देण्यात आला. परतुर व मंठा या दोन्ही तालुक्यांमध्ये अगोदरच मजबूत असलेल्या भारतीय जनता पक्षाला शिवाजीराव जाधव व माऊली तनपुरे यांच्या पक्ष प्रवेशाने अधिक बळकटी मिळाली आहे. 

परतूर येथे दीपावली पाडव्याच्या निमित्ताने आयोजित स्नेह मिलन कार्यक्रम प्रसंगी हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादीत कार्यरत होतो, मात्र स्थानिक स्तरावर नेतृत्वाचा अभाव, गोंधळलेली दिशा आणि जनतेपासून दुरावलेली भूमिका यामुळे आम्ही नाराज झालो होतो. परंतु आतापर्यंत हिवराच्या झाडाखाली उभे असलेले आम्ही आंब्याच्या झाडाखाली आलो असल्याची भावना भावली तनपुरे यांनी तर भारतीय जनता पक्षाच्या जुन्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी पाठीवर थाप देऊन पक्षप्रवेशासाठी बळ दिले शाबासकीची थाप दिले या निमित्ताने पक्षातील लोकांनी दिलेले पाठबळ आयुष्यभर विसरणार नसल्याची भावना शिवाजीराव जाधव यांनी यावेळी व्यक्त केली. दिवाळी स्नेह मिलन ही आमदार बबनराव लोणीकर यांनी मागील 27 वर्षापासून सुरू केलेली परंपरा असून ही परंपरा यापुढे देखील कायम सुरू राहील असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी केले.


पक्षप्रवेश करताना कार्यकर्त्यांनी भाजपचे नेतृत्व, पक्षाची विकासाभिमुख भूमिका आणि पारदर्शक कारभार याबद्दल विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झपाट्याने बदल घडतो आहे. आम्हालाही त्या परिवर्तनाचा भाग व्हायचं आहे," असे नवप्रवेशित कार्यकर्ते शिवाजीराव जाधव व माऊली तनपुरे यांनी सांगितले. परतूरमध्ये भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास आम्हाला मिळतो आहे. आम्ही सर्वांचा सन्मान राखून, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचे काम करत आहोत. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजली असून हा केवळ पक्षप्रवेश नाही, ही विरोधकांच्या बद्दल जनतेच्या मनातील नाराजीची झलक आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केले.

पुढे बोलतांना आमदार लोणीकर म्हणाले की मी महाराष्ट्र शासनात पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. या कालावधीत मी फक्त कागदावर योजना आखल्या नाहीत, तर प्रत्यक्षात हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आणि तो जमिनीवर उतरवला. परतूर मंठा मतदारसंघात मी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ४,७०० कोटी रुपयांहून अधिक निधी आणला आहे, आणि हा आकडा महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघापेक्षा जास्त आहे. हे पैसे फक्त सरकारी खात्यात जमा झालेले नाहीत, तर ते विकास कामाच्या माध्यमातून तुमच्या गावात, तुमच्या घरापर्यंत, तुमच्या शेतापर्यंत पोहोचले आहेत. असे आपल्या भाषणात नमूद करत पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की हे आकडे नाहीत, हे तुमच्या चेहऱ्यावरील आनंदाचे, समाधानाचे आणि आशेचे प्रमाणपत्र आहेत. ३०० गावांना प्रत्येकी १ कोटी ते १० कोटी रुपयांचा निधी या माध्यमातून मिळाला, म्हणजे प्रत्येक गावात मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज यासाठी थेट मदत झाली. ६५ वाड्यांमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून पक्के रस्ते बांधले गेले, जेणेकरून पावसाळ्यात चिखल आणि हिवाळ्यात धूळ यापासून मुक्ती मिळाली. २०० गावांत सांस्कृतिक सभागृह उभी राहिली, जिथे तुमच्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, ग्रामसभांचे आयोजन आता अभिमानाने होऊ शकते. असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.


पर्यटन विकासासाठी ५०० कोटी रुपये खर्च केले गेले, कारण परतूर मंठा केवळ शेतीचा भाग नाही, तर पर्यटनाच्या दृष्टीनेही समृद्ध आहे. आणि रस्ते विकासासाठी तब्बल १,१०० कोटी रुपये खर्चून आम्ही गावागावांना जोडले, बाजारपेठांशी जोडले, शहरांशी जोडले. या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे परतूर मंठा वॉटर ग्रिड. १७३ गावांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्याचा उद्दिष्ट बाळगतो आता गावातील स्त्रियांना किलोमीटर दूर जाऊन पाणी आणण्याची वेळ नाही. हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मॉडेल ठरला आहे. मागासवर्गीय मुलींसाठी दोन्ही हॉस्टेल्स फक्त परतूर मंठा मतदारसंघात आणण्यात यश आले. याचा अर्थ, आमच्या मुलींना शिक्षणासाठी घर सोडावे लागणार नाही, आणि आमच्या युवकांना खेळासाठी मोठ्या शहरांत जावे लागणार नाही. असेही आमदार बबनरावजी लोणीकर म्हणाले.

यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर अंकुशराव बोराडे शत्रुघ्न कणसे नितीन राठोड विक्रम ऊफाड सतीश राव निर्वळ आबासाहेब बोराडे संदीप भैया गोरे गणेशराव खवणे रमेशराव भापकर संपतराव टकले वैजनाथराव बोराडे पंजाबराव बोराडे राजेश मोरे नागेशराव घारे तुकाराम सोळंके संभाजी वारे रवी सोळंके आनंद जाधव अजय अवचार विठ्ठलराव काळे किरण अंभोरे अमोल मोरे प्रवीण सातोनकर दीपकराव बोराडे संदीप बाहेकर गजानन लोणीकर लक्ष्मण बिल्हारे ज्ञानेश्वर माऊली शेजुळ जिजाबाई जाधव माणिकराव वाघमारे रामकिसन बोडखे एडवोकेट उत्तमराव राठोड एडवोकेट भगवानराव रेपे कैलासराव बोराडे सुधाकर बापू सातोणकर गजानन राजबिंडे गुलाबराव लाटे परमेश्वर आकात गजानन देशमुख विकास पालवे विलास घोडके मोहनराव आढे तानाजी शेंडगे महेश पवार राधाकिसन माने बाळासाहेब अंभिरे बंकटराव सोळंके प्रदीप ढवळे दिगंबर मुजमुले शहाजी राक्षे  प्रसादराव गडदे प्रकाश टकले संजय तौर कैलास शेळके छाया घोरबांड प्रकाश चव्हाण प्रवीण सातॊणकर कृष्ण आरगडे नरेश कांबळे सावता काळे सुरेश काळे गजानन चौडे अशोक बेरगुडे  यांच्यासह संतांची उपस्थिती होती.

 यावेळी शिवाजीराव जाधव यांच्या सह विकास जाधव प्रकाश जाधव गोपाळ जाधव शहाजी वाकडे दीपक खंदारे अशोक शिंदे काशिनाथ जाधव गणेश जाधव नारायण डोंबे निलेश जोशी रामभाऊ जाधव सतीश वाघ दत्ता धारकर प्रवीण पवार विशाल जाधव प्रमोद विधाते निवास राठोड पंकज पवार शंकर जाधव गजानन कडूकर ऋषी जाधव आकाश जाधव रोहित जाधव अनिकेत मस्के अजिंक्य मस्के अविष्कार मस्के हरीश जाधव युवराज हिवाळे रोशन राठोड कृष्णा जाधव जगदीश राठोड अरुण सांगोळे दत्ता सांगोळे बाबुराव राठोड अजय वाघमारे पांगरी खुर्द येथील उपसरपंच सुभाष राठोड जनार्दन राठोड राजेभाऊ चव्हाण ज्ञानेश्वर राठोड बबन चव्हाण पंजाब चव्हाण संजय चव्हाण रामेश्वर राठोड संजय चव्हाण रामराव पवार गजानन चव्हाण रोहिदास राठोड गजानन राठोड भारत राठोड अशोक काळे रामदास शेंडगे करण काळे सुंदर काळे उमेश काळे रामू काळे पवन काळे बाळाभाऊ शेंडगे भिकू शेंडगे रामप्रसाद चव्हाळ गणेश शिनगारे कृष्णा वायाळ रणजीत चव्हाण सुरेश वायाळ राधाकिसन वायाळ उपसरपंच विठ्ठलराव वरकटे राहुल वायाळ श्रीधर चव्हाण कुणाल राठोड अविनाश चव्हाण योगेश आढे नरेश राठोड जय चव्हाण विशाल विष्णू वायाळ (माजी सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस) मधुकर वायाळ गणेश राठोड मुंजा भाऊ वायाळ स्वामी नवटके योगेश वायाळ अभिजीत वायाळ विकास नवटके विकास वायाळ सुशील वायाळ कुलदीप वायाळ विशाल वायाळ अनिरुद्ध वायाळ शिवराज वायाळ प्रथमेश वायाळ प्रसाद काकडे गणेश वरकटे बाळू मस्के हर्षद सांगोळे अभिषेक आटोळे  परदीप राजगुंडे  सचिन खोमणे नवनाथ खराबे भागवत  खराबे ठेंगे वडगाव चे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर खरात माजी सरपंच सिताराम खरात माजी सरपंच बबन खरात ग्रामपंचायत सदस्य कैलास बनकर संभाजी बनकर विष्णू खरात बबलू साळवे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यांच्या पक्षप्रवेशामुळे हेलस जिल्हा परिषद सर्कल सह मंठा तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे ताकद वाढली असल्याचे म्हटले जाते.

 पूर्वाश्रमीचे कट्टर सुरेश कुमार जेथलिया समर्थक असलेले श्री ज्ञानेश्वर माऊली तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला. माऊली तनपुरे हे काँग्रेस सहकार विभागाचे जालना जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्याचप्रमाणे परतुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व वाढवणा ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे त्यांच्यासह समर्थकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असल्याचे म्हटले जात आहे माऊली तनपुरे यांच्यासोबत वाढवणा येथील माजी उपसरपंच अशोकराव शेळके माजी उपसरपंच आत्माराम जाधव सोसायटी संचालक बापूराव तनपुरे माजी उपसरपंच दिनकर आहे माझी चेअरमन सुभाष शेळके माजी सरपंच भीमराव जाधव बाळासाहेब शेळके शिवनाथ शेळके युवा उद्योजक गोविंद जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य अशोकराव तनपुरे माजी ग्रामपंचायत सदस्य रामा कुऱ्हे भारत शेळके विश्वनाथ लाटे रामा साळवे गोविंद शेळके संजय राठोड नारायण तनपुरे काशिनाथ लाटे सोपान तनपुरे आकाश साळवे निवृत्ती तनपुरे अनिल तनपुरे दिलीप शेळके ज्ञानेश्वर लाटे तुकाराम तनपुरे पंढरी अंभोरे राजेश थिटे अर्जुन खादवे शिवाजी तनपुरे पांडुरंग तनपुरे काशिनाथ साळवे शेख चंद्रकांत शेळके रमेश शेळके गणेश पुरे विष्णू झोपडे शामराव शेळके शिवाजी शेळके बंटी साळवे कृष्णा मोहिते परमेश्वर पवार सुनील जाधव सतीश चव्हाण भगवान जाधव पप्पू शेख रजाक शेख अनवर सय्यद कृष्णा चव्हाण मच्छिंद्र आवारे दिलीप बांगर धोंडीराम बांगर रघु येडे विनोद गडशिंग महादेव गडशिंग लक्ष्मण चव्हाण युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भारत मरळ प्रदीप मरळ राहुल जाधव विनोद चव्हाण विशाल जाधव गणेश चव्हाण नितीन चव्हाण शुभम राठोड देविदास जाधव शिवाजी मरळ पवन मरळ भिकन शेख विलास चव्हाण अरुण महाराज चव्हाण शुभम राठोड पवन जाधव यशराज राठोड अक्षय जाधव युवराज राठोड ऋषी चव्हाण योगेश चव्हाण शैलेश पवार विनोद गिरी दयासागर राठोड अरुण चव्हाण गणेश राव गवळी सिद्धेश्वर गवळी काशिनाथ तांगडे अजय कवडे तेजस गवळी शंकर खवणे कैलास भिसे लक्ष्मण खोसे योगेश गवळी शंकर खोसे गणेश गवळी हनुमान निर्वळ विजय खोसे महादेव निर्वळ लक्ष्मण खोसे योगेश खोसे प्रकाश खोसे नारायण खोसे आदित्य वरकड अजय खोसे सुभाष शेजुळ रखमाजी सराटे कृष्णा शेजुळ प्रभाकर शेजुळ विशाल मगर अनिल तरवटे विलास ढोले रवींद्र ढोले सतीश ढोले युवा उद्योजक अनिल मुळे वैजनाथ नागरे एकनाथ नागरे परमेश्वर नागरे सखाराम अवचार ईश्वर अवचार ग्रामपंचायत सदस्य उस्मानाबाद राठोड माजी उपसरपंच ताराचंद पवार शिवाजी पवार कैलास राठोड अंकुश राठोड रामभाऊ जाधव अंकुश जाधव बाळू जाधव विलास राठोड रोहिदास राठोड गणपत चव्हाण विठ्ठल चव्हाण राजेश पवार रमेश साळवे अरुण साळवे कैलास दरफडे  विशाल रोखदे भारत कळकुंबे संदीप साळवे दत्ता बागल बाळू तात्या बागल तुकाराम भोंगाने गजानन काकडे बबन बागल गणेश काळे अमोल जाधव माऊली टोणपे अविनाश काळे धनंजय मुळे बालाजी काळे , राजेभाऊ साकळकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला

 त्याचबरोबर किशोर भाऊ खंदारे मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यामध्ये मनोज मुंडे नंदकिशोर ठाकरे सतीश घोडके योगेश खंदारे दीपक सरकटे जगन गुंड शुभम गुंड नवल खंदारे सतीश साठे प्रकाश सुरसे सुनील लाड दत्ता डोईफोडे आकाश डोईफोडे अनंता घोडे संजय उघडे मोहन उघडे योगेश आंधळे कुणाल वाघ नंदकिशोर वाघ ह भ प गोविंद महाराज खंदारे दिनकरराव खंदारे भानुदासराव खंदारे गणेशराव खंदारे शिवाजीराव खंदारे अशोकराव खंदारे ईश्वर भारस्कर गजानन भांबळे विठ्ठल मापारी सतीश खंदारे वसंत पवार बाळू खंदारे भिवसेन बोराडे  बबन खंदारे रावसाहेब सरोदे भगवान नवघरे सोपान सरोदे, रमेश सरोदे संतोष नवघरे सोपान जाधव सोपान घेटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला 

 याव्यतिरिक्त आनंदगावचे उपसरपंच बाळासाहेब मोरे पिंपरखेडा ग्रामपंचायत माजी सदस्य भास्कर हजारे सेवली येथील सतीश सदावर्ते यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचे कृष्णा सदावर्ते विशाल सदावर्ते पांडुरंग दहिजे सुधाकर सदावर्ते विकास सदावर्ते नारायण पवार शरद सदावर्ते विलास सदावर्ते पवन बनकर अमोल सदावर्ते तर टाकळखोपा येथील काँग्रेस पक्षाचे सरपंच प्रभाकर बोर्डे संतोष गायकवाड तानाजी वच्छे एकनाथ गायकवाड पांडुरंग गायकवाड ज्ञानेश्वर ढोले यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.