Ticker

6/recent/ticker-posts

दिग्रसमध्ये पान मटेरियलच्या नावाखाली खुले आम गुटखा विक्री



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : राज्य सरकारने राज्यात गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्रीवर 19 जुलै 2012 रोजी बंदी जाहीर केली. ही बंदी 20 जुलै 2012 रोजी अमलात आली. त्यानंतर या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने ही बंदी वैद ठरविली. ही बंदी केवळ विक्रीस नव्हे तर उत्पादन, साठवणूक आणि वाहतूक यावरील लागू आहे. मात्र असे असतानाही दिग्रस शहरातील काही दुकानदार पान मटेरियल च्या नावाखाली गुटखा विक्री करीत असल्याचे दृष्टीस पडत आहे.एक वर्षेपूर्वी काही दुकानदारावर गुटखा तस्करीखाली गुन्हे पण दाखल झाले होते. काही पान मटेरियलच्या दुकानदारानी कमिशनवर दुचाकीने खेडोपाडी गुटखा पोहोचण्यासाठी काही युवकांची नेमणूक केलेली आहे. 

ते ग्रामीण भागात पान टपरीवर,किराणा दुकानात बिनधास्तपणे गुटखा पोहोचवत आहे. विशेष म्हणजे सकाळी सहा वाजताच ते ग्रामीण भागात गुटखा पोहोचवितात.सध्या नजर, विमल, राज निवास या गुटख्यास ग्राहकांची पसंती असून चढ्या भावाने विक्री केल्या जात आहे. किरकोळ विक्री हे पान मटेरियल च्या दुकानातून केली जाते. फेरीवाले ग्राहक यांना गोडाऊन मधून माल दिल्या जातो. तर थोडाफार माल घरी ठेवण्यात येतो. ही तालुक्यातील वास्तविकता आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ व नशा मुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टाना यामुळे सुरूग लागण्याची शक्यता आहे. परिणामी पोलीस अधीक्षक, तथा पोलीस आयुक्तांनी गुटख्याच्या बेकायदा विक्री कडेही लक्ष द्यावे असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य अमली पदार्थ मुक्त करण्याची व्यापक मोहीम सुरू आहे. मात्र गुटखा सारखा पदार्थाचा दिग्रस मध्ये बिनधास्त होणाऱ्या विक्रीमुळे प्रशासनाची कार्यपद्धती फोल ठरत आहे. शहरासह ग्रामीण भागात गल्लीबोळातील पान टपरीवर, किराणा दुकानात सहज गुटखा मिळतो. गुटखा विक्रीवर बंदी असताना तो मिळतोच कसा? स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या चालणाऱ्या विक्रीकडे पोलिसांचे लक्ष नसल्याचे चित्र दिसून येत आहे.