Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक-शिक्षकांचा समन्वय महत्त्वाचा आहे....



 बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

आजच्या युगात केवळ महाविद्यालयीन शिक्षण पुरेसे नाही तर मूल्याधिष्ठित शिक्षण, सामाजिक भान आणि व्यक्तिमत्व विकास हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच पालक आणि शिक्षक यांनी एकत्रितपणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत संवाद करणे अत्यंत आवश्यक आहे.  असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद,प्राडॉ.संजय क्षीरसागर यांनी केले. पुसेगाव येथील,कला व वाणिज्य महाविद्यालयात पालक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले ,प्रा.डॉ.ए. एस.जगताप,प्रा.डाॅ.संजय.क्षीरसागर,प्रा.श्रीमती.एम.बी.सोनार. इत्यादी उपस्थित होते.

पुढे आपल्या भाषणात डॉ. क्षीरसागर म्हणाले," विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहून ज्ञान संपादन केले पाहिजे. तसेच पाल्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम,  परीक्षा पद्धती, उपयुक्त कौशल्य विकास उपक्रम, विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती, अंतर्गत मूल्यांकन ,विविध शैक्षणिक व सह शैक्षणिक उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

 तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडी अडचणी, ताण- तणाव व्यवस्थापन, इंटरनेट, मोबाईल वापराचे परिणाम, स्पर्धा परीक्षेची तयारी या बाबत मार्गदर्शन केले. प्रसंगी सौ. आशा जगदाळे ,श्री. गणेश रणसिंग या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले  यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीवर  प्रकाश टाकला. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यातील समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. पालक मेळाव्याच्या निमित्ताने पालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा संदेश देत महाविद्यालयाने एक सकारात्मक पाऊल उचललेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे मेळावे सातत्याने आयोजित करण्यात येतील असे आश्वासन यावेळी दिले. 

कार्यक्रमाचे प्रास्तावित पालक मेळाव्याचे प्रमुख आयोजक प्रा.डॉ.ए.एस जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना नवीन शैक्षणिक धोरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती याविषयीची माहिती दिली.सूत्रसंचालन प्रा.श्रीमती एम.बी.सोनार यांनी केले.तर आभार प्रा.डॉ.हनुमंत निमसे यांनी मानले.कार्यक्रमासाठी पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.