कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
जालना: अखिल भारतीय महानुभाव परिषद, जालना जिल्हा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री चक्रपाणी महाराज अवतार दिन २०२५ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा भव्य धार्मिक सोहळा रविवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री क्षेत्र दत्त मंदिर, काजळा (ता. बदनापूर, जि. जालना) येथे पार पडणार आहे.
या प्रसंगी महानुभाव संप्रदायाचे नामवंत विद्वान प.पू.प.म. मा.आचार्य बाबुळगावकर बाबा शास्त्री लाडगाव यांच्या अध्यात्मपूर्ण प्रवचनाने भक्तांना आध्यात्मिक ज्ञानाचा अमृतरस अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे आयोजन अ.भा.मा.प. जिल्हा परिषद, जालना यांच्यावतीने करण्यात आले आहे.या पवित्र सोहळ्याच्या आयोजनासाठी प.पू.श्री. बलदेव राज बाबुळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू असून, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.अधिक माहितीसाठी संपर्क: ९५४५०५०२३७अखिल भारतीय महानुभाव परिषद, जालना जिल्हा समिती.





Social Plugin