अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
या वर्षी मराठवाड्यात पावसाने थैमान घातले असून याआसमानी संकटाने शेतकरी पूर्ण पणे उध्वस्त झालाआहे.सोयाबीन,कापूस,तूर या पिकासह फळबागा पूर्णपणे अतिवृष्टी ने वाया गेल्या आहेत या संकटांने शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.या संकटात मराठवाड्यातील अडचणींत आलेल्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खूप मोठे आहे आणि याची भरपाई होण्यासाठी व पुन्हा उभे राहायला शेतकऱ्यांना अजून खूप वर्ष लागतील.
या संकट काळात माणुसकीच्या नात्याने मदतीचा खारीचा वाटा म्हणून छोटासा मुलगा चि शिवराज संतोष मुळे (भालगाव)याने आपल्या स्वतःच्या खाऊच्या गल्ल्यात जमा केलेले पाच हजार रुपये हे पीडित शेतकरी व पुरग्रस्ताला मदत म्हणून अंबड चे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये (CM रिलीफ फंड) जमा केले व शेतकऱ्यांना मदतीसाठी सामाजिक संस्था,नागरिक,नोकरदार,राजकारणी,व्यापारी या सर्वांनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले आहे..
.jpg)




Social Plugin