*येत्या पंधरा दिवसात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार*
प्रतिनिधी
आपण अहोरात्र शेतकरी कष्टकरी जनतेबरोबरच मतदार संघाच्या विकासासाठी सदैव कार्यरत असतो असे उद्गार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी काढले
ते शेलगाव तालुका परतुर येथे खांडवी रंगोपंत टाकळी शेलगाव 0४ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की, फडणवीस सरकार हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असून झालेल्या अतिवृष्टीमुळे हैराण असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, खांडवी रंगोपंत टाकळी शेलगाव हा रस्ता अतिशय खराब झाला होता ही गोष्ट ध्यानात घेऊन या रस्त्याच्या कामासाठी आपण पुढाकार घेत निधी उपलब्ध करून दिला असून या रस्त्याच्या कामामुळे या भागातील नागरिकांचा शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याची यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, बारामती हे विकासाचे मॉडेल असल्याचे महाराष्ट्राला सांगितले जाते मात्र त्यापेक्षाही अधिकची कामे आपल्या मतदारसंघात झालेली असून मी स्वतः बारामती येथे जाऊन पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केले होते त्यावेळी बारामती आणि आपल्यातला फरक मला जाणवला खऱ्या अर्थाने परतुर तालुक्यामध्ये आणि मंठा तालुक्यामध्ये झालेला विकास हा बारामतीच्या कितीतरी पटीने अधिक असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 13 पैकी 13 जिल्हा परिषदेचे सर्कल भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येतील अशी खात्री असून, आपण सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्याचे यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद
*येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागा*
येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाच्या निवडणुका असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आघाडीवर राहून काम करणारा कार्यकर्ता असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी कंबर कसून कामाला लागण्याचे आदेश यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना दिले
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संपत टकले गजानन लिपणे, दिनकरराव लिपणे, अंकुशराव लिपणे, भास्कर आडळकर, ज्ञानेश्वर लिपणे, विष्णू लिपणे, विक्रांत लिपणे, शरद सोळंके, रामप्रसाद डुकरे, रविंद्र सोळंके, लक्ष्मण ठोंबरे, सय्यद मोबीन, बाबाराव पवार, उध्दव सागडे, रंगनाथ रेंगे, बबन भालके यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती





Social Plugin