. 2 नोव्हेंबर नायगाव तालुका वासियांसाठी छाती फुगवून चालण्याचा दिवस. हा सैनिक माझ्या गावचा आहे म्हणण्यापेक्षा मी ह्या सैनिकाच्या गावचा आहे,असे कौतुकाने सांगण्याचा दिवस. तो दिवस म्हणजे, एक गरीब कुटुंबातील शेळगाव नगरीचा सुपुत्र, वयाच्या उमलत्या तारुण्यातली 17 वर्ष देशाच्या संरक्षणाचं कार्य प्राण तळहातावर घेऊन जबाबदारीने पार पाडलं.तो भारतीय जाबाज सैनिक सन्माननीय श्री देवीदास चांदोबा वाघमारे त्यांची सेवा कार्यपूर्ती झाल्याने, त्यांच्या आगमनाने जन्मभूमीला गौरवांवीत करण्याचा दिवस.
देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणे साधी गोष्ट नाही, त्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं. त्यांचं नातं बंदूका, तोफा, रणगाडे, बारूद ,राफेल यांच्याशी असते. त्यांचे रोजचं जगणं म्हणजे ,दंगली, घुसखोरी, नक्षलवादी-दहशतवादी हमला, सर्जिकल स्ट्राइक,यांच्याशी जोडलेलं असतं. ज्यांचा एक-एक दिवस, एक- एक घंटा, एक -एक क्षण मरणाच्या दारातून जात असतो.
थंडी ऊन वारा छातीवर झेलून देशाच्या स्वाभिमानासाठी सर्वस्व अर्पण करण्याचं ध्येय उराशी बाळगणारी माणसं सामान्य नसतात.दूरदर्शनवर अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या बातम्या ऐकून त्यांच्या माय-बापाचं काळीज हजार वेळा थर्रारलं असेल. त्या काळजाला आस्वस्थ करून, विसावा देण्याचा दिवस. ज्या सैनिकांच्या विश्वासावर आम्ही मस्त रात्रीला निवांत झोपलो, निर्भयपणाने अनेक सणं साजरे केले. त्या सैनिकांप्रती माझंही काही देणं लागतं. ते देणं देऊन ऋणातून मुक्त होण्याचा दिवस.
-





Social Plugin