Ticker

6/recent/ticker-posts

विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल, महारचिकना. येथे दीपावली सणानिमित्त आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा संपन्न.



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी 

13 ऑक्टोंबर 2025 वार सोमवारला विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल, महारचिकना. येथे कागदापासून आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यशाळेला मेहकर येथील प्रसिद्ध कलाशिक्षक श्री.रामेश्वर तोंडे सर मार्गदर्शन केले. या मध्ये कागदापासुन वेळी शाळेचे आकाश कंदिल,टाकाऊ पासुन पाण्याच्या बॅटल पासून आकाश दिवा, तेलाच्या कॅनीपासुन कचरा सुपली व बॅटल पासुन भांडे घासण्याचे वस्तू कशा तयार करतात ते पण टाकाऊ पासून टिकाऊ प्रशिक्षण विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रशिक्षण आंनदमय वातवरणात दिले. 

यावेळेस मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यशाळेमध्ये अतिशय आनंदाने सहभाग घेतला. आज आपल्या विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम मातीपासून गणपती, बैल, विविध कला, कागदापासून आकाश कंदील बनवण्याची कला विद्यार्थ्यांना यावी व कागद काम यावे. हाच नवीन शैक्षणिक धोरणानुसार किमान कौशल्याच्या आधारावर कार्यशाळा ठेवण्यात आली. होती. हाच कार्यशाळाचा मुख्य उदेश आहे.