संतोष फुलारी @प्रतिनिधि 31/10/25
नेवासा तालुक्यातील भेंडा गावच्या कन्या पुजा ताई शिवाजीराव शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य सेवा (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून क्लास वन अधिकारी पदावर नियुक्ती मिळवली आहे.
पुजा ताई या नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष तसेच भेंडा गावचे माजी सरपंच शिवाजीराव शिंदे यांच्या कन्या आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात मोठे यश संपादन करत नेवासा तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल भेंडा व नेवासा परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, तरुण वर्गासाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.





Social Plugin